(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips : तुमच्या आधीच्या रिलेशनमध्ये झालेल्या 'या' चुका पुन्हा करू नका, अन्यथा पुन्हा नात्यात येईल कटुता
Relationship Tips : पूर्वीच्या नात्यात झालेल्या काही चुका पुन्हा केल्याने तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते. कोणत्या आहेत त्या चुका? जाणून घ्या..
Relationship Tips : आपल्या आयुष्यात असे अनेक टर्निंग पॉईंट्स म्हणजे अशी वळणं येतात, ज्याच्या आठवणी एकदम पुसून टाकता येत नाही, त्या कायम लक्षात असतात, त्यापैकी एखाद्याचे ब्रेकअप होते तेव्हा अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात, या मानसिक तणावातून त्यांना काढणे मुश्किल असते, मात्र बदलत्या वेळेनुसार ते सावरतात. नातं तुटणं कोणालाही त्रासदायक ठरू शकते. मात्र अनेकवेळा असे घडते की आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो, ज्यामुळे आपले नाते फार काळ टिकत नाही. अशात, एखाद्याने पूर्वीच्या रिलेशनमध्ये केलेल्या काही चुका करणे टाळले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.
संवादाचा अभाव
अनेक वेळा आपण आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमच्या नात्यात ही चूक करत असाल तर तुम्ही ही चूक सुधारली पाहिजे. अनेक वेळा संवादाच्या अभावामुळे नात्यात वाद निर्माण होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पूर्वीच्या नात्यात ही चूक केली असेल, तर तुम्ही ही चूक पुन्हा करू नका.
पार्टनरला स्पेस द्या
जर तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेस देत नसाल तर तुम्ही हे करू नये. नात्यात दोघांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेस दिल्यास तुमच्या पार्टनरला ते आवडेल.
जुन्या नात्याची तुलना
तुम्ही तुमच्या जुन्या जोडीदारासोबत भूतकाळात काय केले आहे याबद्दल तुमच्या सध्याच्या जोडीदाराशी चर्चा करू नये. असे केल्यास तुमच्या नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. तुलनामुळे नवीन नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात.
जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न
कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून या पद्धतीची मागणी करू नये. यामुळे तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते.
हेही वाचा>>>
Relationship : फक्त तुम्हीच नाही! ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात 'असे' बदल, जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )