(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratha Saptami 2021 Date: जीवनातील सूर्याचे महत्व सांगते रथसप्तमीची पूजा, मान सन्मान आणि उच्च पदाची मनिषा पूर्ण
Ratha Saptami 2021: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. या दिवशी पूजा, व्रत आणि उपासना केल्यास चांगलं मानलं जातं.
Arogya Saptami: पंचांगानुसार 19 फेब्रुवारी रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. धार्मिक दृष्टीकोनातून या सप्तमीच्या तिथीचे व्रत, पूजा आणि उपासनेला चांगलं मानण्यात येतंय. या दिवशी सूर्य देवाची विशेष पूजा करण्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असा समज आहे. असे करणाऱ्यांच्या मान सन्मानात वृद्धी होते असं मानलं जातं.
हिंदू धर्मात आत्मशुद्धीला विशेष महत्व मानलं जातं. गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने आत्म्याच्या विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सूर्याचा मनुष्याच्या आत्म्यावर प्रभाव असतो असं सांगण्यात येतंय. आपल्या आयुष्यात प्रकाशाला मोठं महत्व आहे. अंधकाराला प्रकाशच दूर करतो.
मान, सन्मान आणि उच्च पद सूर्याला ज्योतिष शास्रात एक महत्वाचा ग्रह मानलं जातं. सूर्याचा प्रभाव शुभ असेल तर व्यक्तीला जीवनात भरपूर मान सन्मान प्राप्त होतो. असे लोक जीवनात उच्च पदावर जातात. मनुष्याच्या जीवनात सूर्याची स्थिती उत्तम असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीच्या लोकप्रियतेत वाढ होते असं सांगण्यात येतं.
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी हवालदिल
रथ सप्तमी दिवशी पूजा आणि व्रताचे महत्व रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे. या दिवशी सुर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असं सांगण्यात येतंय. म्हणून याला आरोग्य सप्तमीही म्हटलं जातं. सप्तमीच्या महत्वाबद्दल ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराण यातही वर्णन पहायला मिळतंय.
पूजा विधी या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे स्मरण करावं, सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केला पाहिजे. तसेच या दिवशी गायत्री मंत्राचा जप केल्यास लाभ होतो. अपत्य प्राप्तीसाठी आजच्या दिवशी पूजा करणे चांगलं असतं. माघ महिन्याचा शुक्ल पक्षाची सप्तमी सूर्याची जन्मतिथी मानण्यात येते.