एक्स्प्लोर

Coronavirus: कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा आदेश

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत असल्याचं दिसत असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे आता गृह विलगीकरण, लग्न समारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी कोरोनाचे नियम भंग करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये 300 मार्शल्‍स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध सक्‍त सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

महापालिका आयुक्‍त चहल म्‍हणाले की, "जून-जुलै 2020 मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड19 संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड 19 प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे."

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वेगवेगळ्या सूचना केल्‍या आहेत. त्‍या पुढीलप्रमाणेः

1) लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून 5 ते 6 वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तिंची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्‍प्‍टोमॅटिक रुग्‍णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे.

2) ज्‍या रहिवासी इमारतींमध्‍ये पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्‍यात येतील.

3) लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात यावेत.

4) लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्‍या किमान 5 जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करावेत.

Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

5) मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱ्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत असलेल्‍या 2400 मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती 4800 इतकी करावी. विना मास्‍क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने सध्‍या होत असलेली सरासरी 12,500 नागरिकांवरील कारवाईची संख्‍या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान 25 हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी.

6) मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर 100 यारितीने एकूण 300 मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी.

7) विनामास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.

8) बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करुन त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.

9) सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, 50 पेक्षा अधिक व्‍यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.

10) खेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळणाऱयांवर कारवाई करण्‍यात येईल.

11) कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या अधिक असलेल्‍या विभागांमध्‍ये मिशन झिरोच्‍या धर्तीवर कार्यवाही सुरु करावी. ज्‍या विभागांमध्‍ये नवीन रुग्‍ण मोठ्या संख्‍येने आढळून येत आहेत, तेथे एरिया मॅपिंग करुन, त्‍या क्षेत्रांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त संख्‍येने चाचण्‍या करण्‍यात याव्‍यात. तसेच अशा परिसरांमध्‍ये प्रति रुग्‍णामागे किमान 15 नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती (हायरिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट) शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवावे.

12) झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी करावी. फिरत्‍या दवाखान्‍यांच्‍या (मोबाईल व्‍हॅन) माध्‍यमातून रुग्‍ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्‍या कराव्‍यात.

13) प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये हाय रिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र 1 आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र 2 असे दोन्‍ही संवर्गातील प्रत्‍येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.

14) भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्‍बो सेंटर्स) मधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्‍णशय्या, ऑक्सिजन रुग्‍णशय्या यांची पुरेशी उपलब्‍धता ठेवावी, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.

15) बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्‍णालयांतून कोविड रुग्‍ण, रुग्‍णशय्या व इतर आवश्‍यक माहिती दर तासाने संकलित करुन ती माहिती डॅशबोर्डच्‍या माध्‍यमातून आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याने अद्ययावत करावी.

16) केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱया प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱया प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

Maharashtra Corona Outbreak: राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! गेल्या महिन्याभरातील कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget