एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Rakshabandhan 2024 Wishes : तुमचा भाऊ किंवा बहिण दूर राहतायत? तर आताच सेव्ह करून ठेवा रक्षाबंधनचे 'हे' सुंदर मेसेज, व्यक्त करा प्रेम 

Rakshabandhan 2024 Wishes In Marathi : जर भाऊ-बहिणींना रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत.

Rakshabandhan 2024 Wishes In Marathi : रक्षाबंधन म्हटलं की भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा खास दिवस.. भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याने बांधलेले सुंदर नाते असते. रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक भाऊ-बहिण हे नातं आपुलकीच्या धाग्याने बांधतात. प्रत्येक अडचणीत एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतो.  (Rakshabandhan 2024 Wishes In Marathi) 

तुमचे भाऊ-बहिण दूर राहतात? भेटता येत नसेल तर संदेशाद्वारे द्या शुभेच्छा..!

यंदा हा सण 19 ऑगस्टला साजरा होणार आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने सर्व भाऊ-बहीण एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. पण, जर काही कारणास्तव तुम्ही या खास प्रसंगी एकमेकांपासून दूर असाल आणि घरापासून दूर असलेल्या तुमच्या भावाला किंवा बहिणीला संदेशाद्वारे राखीच्या शुभेच्छा देऊ इच्छित असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत. (Rakshabandhan Wishes In Marathi) जे तुम्ही आपल्या भाऊ किंवा बहिणीला पाठवू शकता, जेणेकरून दूर राहूनही जवळ असल्याचा आनंद मिळेल,

जन्म झाला तुझा, आनंद झाला आम्हा,
तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा...

सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
नात्याने तू असशील मोठा,
पण तरीही मी आहे तुझी सावली,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा..!!!

लाडाची अशी एकच आमची दीदी, 
तुझी चापट ही मला वाटते आपली, 
तुझ्याशिवाय घराला घरपण नाही, 
ताई रक्षाबंधनाच्या शुभेच्छा...

आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी 
किती तू खोडकर किती तू प्रेमळ,
माझी बहिण आहे सगळ्यात सुंदर
लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..

माझी ताई, आई आणि तुझ्या प्रेमाने माझा दिवस जाई
तुझ्यासोबत मला काढायचे आहे आयुष्य, 
ताई तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही
कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ
घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा...

राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
आनंद झाला, आजचा दिनू आला,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा..

रक्षाबंधनाला भावाला लुटण्याचा दिवस आला
लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने कधीच दूर जाणार नाही,
कोणीही कितीही म्हणाले तरी साथ तुझी कधीही सोडणार नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा...

तुझ्या प्रेमाच्या सावलीत दिवस जातात चांगले, ताई तूच ग मला माझी प्रिय सखे
ताईचा रुबाब असतो आमच्या भारी, तिच्यामुळेच मिळते मला भरारी...

आठवणींच्या हिंदोळ्यात तू कायम असतेस,
तू दूर असलीस तरी जवळ भासते
कितीही बिझी असलो तरी 
आजचा दिवस खास तुझ्यासाठीच असतो
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

हेही वाचा>>>

Rakshabandhan 2024 : यंदा रक्षाबंधनला ब्लड-शुगर लेवल वाढणार नाही? बाहेरच्या भेसळीपासून राहाल दूर! घरीच बनवा 'या' हेल्दी मिठाई

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget