(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ragi Soup Recipe : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती ते वजन वाढविण्यापर्यंत वाचा नाचणीच्या सूपचे भन्नाट फायदे
Ragi Soup Recipe : नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो.
Ragi Soup Recipe : हिवाळ्यात (Winter Season) अनेकदा आपल्याला व्यायाम करणं तसं कठीणच वाटतं. पण, वजन कमी (Weight Loss Tips) करणं गरजेचं आहे. अशा वेळी, वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारच उत्तम पर्याय आहे. पण, अनेक वेळा आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे आपल्याला समजत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यात खूप भूक लागते. अशा वेळी वारंवार भात, चपाती वारंवार आपण खाऊ शकत नाही. आणि मॅगी, समोसे, पराठे, कचोरी हे पदार्थ शरीरासाठी अजिबात आरोग्यदायी नाही. अशा वेळी तुम्ही पोट भरणारा आणि आरोग्यदायीही असा पर्याय शोधत असाल तर तुमच्या आहारात नाचणीच्या सूपचा समावेश नक्की करा.
नाचणीचे फायदे
नाचणी ज्याला फिंगर बाजरी, नाचणी, मांडुआ असेही म्हणतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही भरपूर असतात. हे खाल्ल्याने टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहते. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नाचणी देखील खूप फायदेशीर आहे.
अनेक फायद्यांनी समृद्ध असलेली नाचणी तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. या ठिकाणी नाचणीचे सूप कसं बनवायचं ते जाणून घ्या.
नाचणी सूप रेसिपी
साहित्य :
- कांदा- 1 बारीक चिरून
- आलं - 1 इंच तुकडे
- लसूण पाकळ्या - 5 ते 6
- हिरवी मिरची बारीक चिरून - 2
- तूप- 1 चमचा
- बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, देठांसह ब्रोकोली, तिरंगी शिमला मिरची, मटार, बीन्स)
नाचणीचं सूप बनविण्याची पद्धत
- सर्वात आधी एका कढईत तूप घाला. त्यात कांदा, लसूण, आलं घालून त्याला चांगला सुगंध येईपर्यंत परतून घ्या.
- यानंतर सर्व भाज्या आणि वाटाणे घालून परतवा.
- त्यात मीठ आणि काळी मिरी घालून मिक्स करा. पाणी घालून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवा.
- यानंतर नाचणीच्या पिठात पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट सूपमध्ये घाला. आवश्यकतेनुसार त्यात अधिक पाणी घाला. किमान 5 मिनिटे अधिक शिजवा.
- तुमचं नाचणी सूप तयार आहे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.