वजन झटपट कमी करायचंय? बाबा रामदेवांनी सांगितला सोपा नैसर्गिक फॉर्म्युला; गोळ्या-इंजेक्शन चुकुनही घेऊ नका
Weight Loss Tips by Baba Ramdev:अलीकडेच नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी धावपळीची जीवनशैली आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलवर स्पष्ट मत मांडलं. जाणून घ्या त्यांनी काय सांगितलं.

Patanjali:आजच्या धावपळीच्या आयुष्यात आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणा ही मोठी समस्या बनली आहे. वजन पटकन कमी करण्यासाठी अनेक जण गोळ्या, इंजेक्शनसारखे ‘शॉर्टकट’ उपाय शोधतात. मात्र, अलीकडे नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी यावर आपलं मत मांडत लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला. (Weight Loss Tips)
सिंथेटिक औषधांपासून दूर राहा
सध्या बाजारात Wegovy, Ozempic आणि Mounjaro यांसारखी इंजेक्शन्स आणि गोळ्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. कंपन्यांचा दावा आहे की ही औषधे भूक कमी करून वजन घटवतात. मात्र, बाबा रामदेव यांनी ही साधनं शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगितलं. सिंथेटिक पद्धतीने वजन कमी केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
पतंजलीच्या वजन कमी करणाऱ्या औषधांबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची औषधे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनलेली असून त्यात सिंथेटिक रसायनांचा वापर नाही.
नैसर्गिक उपायांवर भर
-बाबा रामदेव यांच्या मते वजन कमी करण्यासाठी बाह्य औषधांची गरज नाही. त्यांनी काही सोपे आणि परिणामकारक उपाय सांगितले.
-सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं आणि लौकीचा रस घेणं हे चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
-यासोबतच नियमित योगाभ्यास आणि सकाळची धाव (जॉगिंग) शरीराला नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त ठेवते, असं त्यांनी सांगितलं. स्वतः ते पहाटे 3 वाजता उठून योग करतात, असंही त्यांनी नमूद केलं.
-रामदेव यांनी ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे मधूनमधून उपवास करण्याचाही सल्ला दिला. दिवसातून एकदाच जेवण घेतल्यास पोटाला विश्रांती मिळते, असं त्यांचं मत आहे. यासोबतच मोबाईल आणि इंटरनेटपासून थोडा वेळ दूर राहण्याचा म्हणजेच ‘डिजिटल फास्टिंग’सल्लाही त्यांनी दिला. दिवसातून काही तास फोनपासून दूर राहिल्यास मन शांत राहतं आणि एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
- आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. औषधं आणि इंजेक्शन्सच्या मागे न धावता, योग, संतुलित आहार आणि उपवास यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं हाच दीर्घायुष्य आणि तंदुरुस्त शरीराचा खरा मंत्र आहे. माणसाच्या तन आणि मनावर कोणताही ‘डाग’ नसावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.























