Banana : जास्त केळी खाताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम
Banana side effects : रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदेही होतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे अनेक नुकसान देखील होऊ शकते.
Banana side effects : केळं (Banana) हे असे फळ आहे, जे खायला खूप चवदार आणि गोड असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केळी खूप आवडतात. रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदेही होतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे अनेक नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला केळी खाण्याची मर्यादा निश्चित करावी लागेल. तुम्ही एका दिवसात 1-2 केळी आरामात खाऊ शकता, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही खूप वर्कआउट करत असाल तर तुम्ही दिवसातून 3-4 केळी खाऊ शकता, परंतु यापेक्षा जास्त केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊयात जास्त केळी खाण्याचे काय नुकसान आहेत.
जास्त केळी खाण्याचे नुकसान :
1 - लठ्ठपणा वाढतो - जास्त केळी खाल्ल्याने तुम्ही जाड देखील होऊ शकता. केळ्यामध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर असते, दुधाबरोबर केळं खाल्ल्यास वजन वाढते.
2 - पोटदुखी आणि अॅसिडिटीचा त्रास - केळं रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते. केळीमध्ये स्टार्च असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोटदुखीची तक्रार असते. त्यामुळे अनेकांना उलट्याही होतात.
3 - बद्धकोष्ठतेची समस्या - पिकलेलं केळं खाल्ल्याने पोट साफ होते, पण केळी थोडी कच्ची असतील तर बद्धकोष्ठता होऊ शकते.
4 - साखरेची पातळी वाढते - केळी खाल्ल्याने मधुमेह असलेल्या लोकांना खूप नुकसान होऊ शकतं. केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच जास्त साखर असलेल्यांनी केळी कमी खावीत.
5 - दातांची समस्या आणि मायग्रेन - केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. केळ्यामध्ये टायरोसिन हे अमिनो अॅसिड असते, ज्याचे शरीरात टायरामाईनमध्ये रूपांतर होते. यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. दमा असलेल्यांनीही केळी मर्यादेत खावीत. केळी खाल्ल्याने अनेकांना ब्लोटिंग आणि इतर अॅलर्जी होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha