एक्स्प्लोर
Advertisement
Oral Health : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने दात घासता आहात का? दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा
Oral Health : दातांचं आरोग्य (Dental Health) चांगलं राहण्यासाठी रोज दिवसातून दोनदा दात घासणं, दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
Oral Health : प्रत्येकालाच आपले दात (Teeth) स्वच्छ आणि निरोगी हवे असतात. दातांचं आरोग्य (Dental Health) चांगलं राहण्यासाठी रोज दिवसातून दोनदा दात घासणं, दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी खातो, ज्या काही वेळा आपल्या हिरड्या किंवा दातांच्या कोपऱ्यात अडकतात. अशा परिस्थितीत टूथब्रशचा (Toothbrush) योग्य प्रकारे वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण निरोगी दात आणि हिरड्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जाणून घेणार आहोत.
निरोगी दातांसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
- दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून किमान दोनदा दात घासणं फार गरजेचं आहे. एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा झोपण्यापूर्वी दात घासावेत. साधारण दोन ते तीन मिनिटं दात स्वच्छ होईपर्यंत घासा.
- ब्रिस्टल्स निवडताना लक्षात ठेवा की, ते सॉफ्ट असावेत. जेणेकरून तुमच्या हिरड्यांवर कोणतीही जळजळ होणार नाही.
- या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की योग्य दातांच्या आरोग्यासाठी, तुमच्या ब्रशचा आकारही योग्य असावा. खूप मोठा किंवा लहान ब्रश वापरल्याने तुमच्या दातांच्या योग्य स्वच्छतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
- इलेक्ट्रिक ब्रश वापरत असल्यास, तुमच्यानुसार योग्य पॉवर पर्याय निवडा. किंवा तुम्ही ते मध्यम वर देखील सेट करू शकता कारण खूप सॉफ्ट किंवा हार्ड शक्तीचा दातांवर वाईट परिणाम होतो.
- ब्रश वापरत असताना तो ब्रश योग्य प्रकारे हाताळणे देखील फार महत्त्वाचे आहे. नेहमी लक्षात ठेवा ब्रश खरेदी करताना तो सर्वात आधी आपल्या हाताने नीट चेक करा. त्यानंतर तो खरेदी करा.
- संवेदनशील हिरड्यांसाठी बनवलेला फक्त चांगल्या दर्जाचा ब्रश खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण जर ते खूप कठीण असेल आणि टोचू नये म्हणून तुम्ही हलक्या हाताने ते वापरत असाल, तर असे करणे म्हणजे दातांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या दातांची योग्य काळजी घेतली तर दात नेहमी निरोगी राहतील. तसेच, हिरड्यांमधूनही रक्त येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement