Navratri 2024 Recipe: नवरात्रीचा उपवास करताय? दिवसभर राहील एनर्जी! फक्त 'हे' फराळाचे झटपट पदार्थ बनवा
Navratri 2024 Recipe: नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा शिल्लक राहत नाही. म्हणूनच अशावेळी तुम्ही काही फराळाचे पदार्थ ट्राय करू शकता.
Navratri 2024 Recipe: शारदीय नवरात्रीच्या सणाला यंदा 3 ऑक्टोबरपासून सुरूवात झालीय. आपण पाहतोय, सध्या ठिकठिकाणी देवीचा जागर सुरू आहे, देवीच्या आगमनाचा हा अनोखा सोहळा साजरा होत आहे. नवरात्रीच्या काळात भक्त देवीच्या 9 रूपांची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील करतात. अनेकजण काहीही खाल्ल्या-पिल्याशिवाय निरंकट उपवास करतात. पण काही लोकांसाठी असा उपवास खूप कठीण आहे. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा देखील शिल्लक राहत नाही. त्यामुळे उपवासाच्या वेळी तुम्ही काही पदार्थ ट्राय करू शकता.
नवरात्रीच्या उपवास काळात दिवसभर राहील एनर्जी!
शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. यंदा 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या काळात देवीचे भक्त 9 दिवस उपवास करतात. काही लोक फक्त फळं खातात तर काही लोक उपवासाचे पदार्थ खातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास देखील ठेवलात, तर दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुम्ही येथे नमूद केलेल्या काही उपवासाच्या पाककृती ट्राय करून पाहू शकता. जाणून घेऊया त्यांची रेसिपी...
नवरात्रीत या उपवासाच्या रेसिपी ट्राय करा
शिंगाड्याचा पीठाचा शिरा
साहित्य:
शिंगाड्याचे पीठ - 1 कप
तूप - 1/2 कप
पाणी - अर्धा कप
साखर - अर्धा कप
ड्रायफ्रुट्स - 1/4 कप
पद्धत:
शिंगाड्याचा पीठाचा शिरा करण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करा. आता त्यात पीठ घालून हलके भाजून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी, साखर किंवा गुळ घाला. ते चांगले मिसळा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पाणी सुकले की त्यात ड्रायफ्रुट्स टाकून वाफ काढून घ्या. तयार आहे शिंगाड्याचा पीठाचा शिरा..!
कुट्टूच्या पीठाची पुरी
साहित्य
कुट्टूचे पीठ - 1 कप
बटाटा - 1 उकडलेला
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
पद्धत:
सर्व प्रथम, बटाटे एका भांड्यात मॅश करा, त्यात कुट्टूचे पीठ आणि मीठ घाला. आता पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्या. पुऱ्या लाटून तळून घ्या.
बटाटा टिक्की
साहित्य
बटाटे - 2-3 उकडलेले
हिरवी मिरची-1-2
गव्हाचे पीठ - 1 कप
मीठ - चवीनुसार
हिरवी कोथिंबीर - सजावटीसाठी
पद्धत:
सर्व प्रथम एका भांड्यात बटाटे मॅश करा. आता त्यात हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर आणि मीठ घाला. आता त्यांना टिक्कीचा आकार द्या. राजगीराच्या पिठात गुंडाळून फ्राय करून घ्या किंवा तव्यावर बेक करा.
फराळी खिचडी
साहित्य:
साबुदाणा - 2 कप
बटाटा- 2
शेंगदाणे - अर्धी वाटी (ठेचून)
हिरवी मिरची- 1-2
मीठ - चवीनुसार
तेल- आवश्यकतेनुसार
पद्धत:
सर्व प्रथम कढईत तेल गरम करा. आता तेलात बटाटे आणि हिरवी मिरची घाला. बटाटे शिजल्यावर त्यात साबुदाणा आणि मीठ घाला. आता वरून शेंगदाणे कूट घाला.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Recipe: कुरकुरीत...खमंग...नवरात्री स्पेशल 'साबुदाणा वडा' एकदा ट्राय करा, कमी वेळात सोपी रेसिपी, चव राहील कायम लक्षात
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )