Navratri 2024 Recipe: कुरकुरीत...खमंग...नवरात्री स्पेशल 'साबुदाणा वडा' एकदा ट्राय करा, कमी वेळात सोपी रेसिपी, चव राहील कायम लक्षात
Navratri 2024 Recipe: आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नवरात्री स्पेशल साबुदाणा वडा कसा तयार करू शकतो हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
Navratri 2024 Recipe: 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवला सुरूवार होत आहे, देवीच्या आगमनाची घराघरात जय्यत तयारी सुरू आहे, नवरात्रीच्या काळात अनेक जण नऊ दिवस उपवास करतात, या उपवासात काही जण फळं खाल्ली खातात. मात्र या उपवासात काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर साधारणत: बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी प्रत्येक घरात बनते, जी सर्वांनीच खाल्ली आहे, पण यावेळी काहीतरी नवीन करून पाहण्याची वेळ आली आहे.
साबुदाणा वड्याची रेसिपी
जेव्हा तुम्ही नवरात्रीच्या उपवासात अन्न खाता तेव्हा तुम्हाला सतत साबुदाण्याची खिचडी किंवा इतर काही खाण्याचा कंटाळा आलाय? तर येथे आम्ही तुमच्यासाठी साबुदाणा वड्याची रेसिपी घेऊन आलो आहे, जी तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि खायलाही खूप चविष्ट आहे.
साबुदाणा वडा कसा बनवायचा?
साबुदाणा नीट धुवून सुमारे 5 तास पाण्यात भिजत ठेवा.
पुरेसे पाणी आहे हे लक्षात ठेवा, नाहीतर साबुदाणा जास्त भिजून गरगट होऊ शकतो.
साबुदाणा चांगला भिजवून मऊ झाल्यावर अतिरिक्त पाणी काढून टाकावे.
उकडलेले बटाटे मॅश करा. नंतर एका मोठ्या भांड्यात साबुदाणा, मॅश केलेले बटाटे, शेंगदाणे, हिरवी मिरची, आले, जिरे, कोथिंबीर आणि खडे मीठ घाला.
आता त्यात लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा.
मिश्रण एकसारखे ढवळावे जेणेकरून सर्व मसाले चांगले मिसळतील.
या मिश्रणाला लहान गोल वड्यांचा आकार द्या.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचे चपटे वडेही बनवू शकता. कढईत तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात वडे टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
दोन्ही बाजू सोनेरी झाल्या की तव्यातून वडे काढून टिश्यू पेपरवर तेल शोषण्यासाठी ठेवा.
साबुदाणा वडा तयार आहे. हिरवी चटणी, दही किंवा चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.
जर तुम्ही ते उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही त्यात सामान्य मीठ आणि थोडी लाल तिखट देखील घालू शकता.
हेही वाचा>>>
Lifestyle : एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय का? आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )