Navratri 2024 Fashion : नवरात्रीत जुन्या साड्यांपासून बनवा डिझायनर 'इंडो-वेस्टर्न ड्रेसेस!' लूक दिसेल क्लासी, सर्वाच्या खिळतील नजरा
Navratri 2024 Fashion: कपाटात पडलेल्या जुन्या साड्यांच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारचे आउटफिट बनवू शकता. एकदा पाहाच..
Navratri 2024 Fashion : अनेकदा असं होतं की, आपण साड्या नेसतो, पण वर्षोंवर्षे त्या साड्या तशाच कपाटात पडून राहतात. मग त्याचं करायचं काय? असा प्रश्न महिला वर्गाच्या मनात येतो. आपल्या सर्वांच्या घरात जुने कपडे वर्षानुवर्षे कपाटात बंद असतात आणि पडून राहिल्यावर ते खराब होऊ लागतात. आईच्या बहुतेक जुन्या साड्या घरात कपाटात बंद पडून राहतात. त्याचबरोबर बदलत्या फॅशनच्या जमान्यात आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. अशा प्रकारे साड्या वाया जाऊ नयेत आणि त्यांचा पुनर्वापर केला पाहिजे. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कपाटात पडलेल्या जुन्या साडीच्या मदतीने तुम्ही विविध प्रकारचे नवीन पोशाख कसे सहज बनवू शकता? तुमचा लूक कसा आकर्षक बनवू शकता.
जुन्या साडीपासून सिक्विन ड्रेस बनवण्याची सोपी पद्धत
- हल्ली सिक्विन साड्यांचा ट्रेंड बऱ्यापैकी दिसून येतो.
- जर तुम्ही या प्रकारची साडी अनेक वेळा घातली असेल आणि ती पुन्हा वापरू शकता.
- यासाठी एखाद्या टेलरची मदत घेऊनही तुम्ही त्यातून लहान ड्रेस बनवू शकता.
- कीव्रॅप ड्रेस बनवण्यासाठी, स्ट्रिंगसाठी सॅटिन फॅब्रिक वापरा.
- तसेच, ड्रेसच्या आत अस्तर घालण्यास विसरू नका.
- कारण सेक्विन फॅब्रिक तुमच्या त्वचेला टोचू शकते.
जुन्या साडीच्या मदतीने फॅन्सी एथनिक पोशाख कसा बनवायचा?
जर तुम्ही घरच्या घरी हेवी आउटफिट बनवण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्ही 2 वेगवेगळ्या साड्या वापरू शकता.
आतील बाजूस तुम्ही प्लेन सॅटिन साडी वापरू शकता.
जाकीट किंवा लांब केप बनवण्यासाठी तुम्ही नेट किंवा शिफॉन फॅब्रिकची साडी वापरू शकता.
जॅकेट अधिक जड करण्यासाठी तुम्ही गोटा-पट्टी लेस वापरू शकता.
जुन्या साडीच्या मदतीने ब्लाउज आणि स्कर्ट कसा बनवायचा?
जुन्या साडीच्या मदतीने तुम्ही ब्लाउज आणि स्कर्ट देखील बनवू शकता.
यासाठी तुम्ही हलक्या वजनाची साडी निवडू शकता.
डिझाइनसाठी तुम्ही फ्लोरल प्रिंट निवडू शकता.
नेकलाइनसाठी डिझाइनची निवड योग्य करा
कारण अशी स्टायलिश नेकलाइन प्लेन आउटफिटवर खूपच आकर्षक दिसेल.
हेही वाचा>>>
Fashion : 'सोन्याच्या साडीत सजले रुप, नाकात नथनी, गाली लाली अन् गजरा..! अदिती-सिद्धार्थचा वेडींग लूक होतोय व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )