एक्स्प्लोर

Monsoon Travel : सह्याद्रीच्या कुशीतील 'एक' अद्भूत धबधबा! फार कमी लोकांना माहिती हे ठिकाण, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!

Monsoon Travel : जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला हे ठिकाण म्हणजे पर्वणीच ठरेल. फोटो आणि व्हिडीओची आवड असणाऱ्या लोकांसाठी हा धबधबा हे फोटोग्राफीचे उत्तम ठिकाण आहे. 

Monsoon Travel : पावसाळा सुरू झाला असून देशासह राज्यात निसर्ग बहरला आहे, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला अद्भूत निसर्गसौंदर्य लाभलंय, इथले निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येतात. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. इथे विविध ट्रेकिंगची ठिकाणं, ऐतिहासिक किल्ले आणि विविध धबधबे आहेत, जे पर्यटकांना भुरळ घालतात. साहसी पर्यटनापासून ते धार्मिक पर्यटनापर्यंत सर्व प्रकारची पर्यटनस्थळे येथे महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला सह्याद्रीच्या या डोंगररांगांतून वाहणाऱ्या एका सुंदर धबधब्याबद्दल सांगणार आहोत.

या धबधब्याचे सौंदर्य म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच!

आम्ही ज्या धबधब्याबद्दल सांगत आहोत, त्याचे नाव कुंभे धबधबा आहे. कुंभे धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात. लोक सहसा येथे पिकनिक, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी येतात. जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर तुम्हाला हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरेल. तर फोटो आणि व्हिडीओची आवड असणाऱ्या लोकांसाठी कुंभे धबधबा हे फोटोग्राफीचे उत्तम ठिकाण आहे. इथे विविध ठिकाणाहून शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकता.

Monsoon Travel : सह्याद्रीच्या कुशीतील 'एक' अद्भूत धबधबा! फार कमी लोकांना माहिती हे ठिकाण, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!
फार कमी लोकांना माहिती हे ठिकाण

मोठ्या शहरांच्या कोलाहल आणि गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत वाहणाऱ्या या धबधब्याची आजही फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे येथे लोकांची फारशी वर्दळ नाही. यामुळेच तुम्ही येथे अतिशय शांत वातावरणात पिकनिक करू शकता. जर तुम्हाला काही काळ कामातून विश्रांती घेऊन एखाद्या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी कुंभे धबधबा हा उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण इथे तुमच्या गोपनीयतेमध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही तुमची सुट्टी इथे खूप आरामात घालवू शकता. तसेच, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगद्वारे तुम्ही तुमची सुट्टी आणखी रोमांचक करू शकता.

धबधब्याला भेट देण्याची उत्तम वेळ

कुंभे धबधब्याला कधीही भेट देता येते, परंतु पावसाळ्यात येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कारण यावेळी धबधब्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यावेळी आजूबाजूला हिरवळही पाहायला मिळते. त्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. पावसाळ्यात धबधब्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे धबधबा आणखी वेगाने पुढे सरकतो. डोंगराच्या मधोमध वाहणारा धबधबा बघितल्यावर विश्वास ठेवा, त्याचे सौंदर्य पाहून काही क्षण तुम्हालाही वाटेल की यापेक्षा सुंदर काय असू शकते?

Monsoon Travel : सह्याद्रीच्या कुशीतील 'एक' अद्भूत धबधबा! फार कमी लोकांना माहिती हे ठिकाण, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!

कसे पोहोचायचे?

सह्याद्रीच्या डोंगररांगांतून वाहणारा कुंभे धबधबा महाराष्ट्रातील माणगाव येथे आहे.

माणगावहून छोट्या पायवाटेने तुम्ही या धबधब्याकडे गेल्यास या धबधब्याचा आवाज दुरून यायला लागेल.

माणगावला जाण्यासाठी रस्त्याने जायचे असेल तर माणगाव बसस्थानकापर्यंत बसची सोय आहे.

जर तुम्हाला ट्रेनने माणगाव गाठायचे असेल तर माणगाव येथे रेल्वे स्टेशन देखील आहे.

हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी, कुंभे धबधब्यापासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे.

जे कुंभे धबधब्यापासून 126 किलोमीटर अंतरावर आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

हेही वाचा>>>

Travel : Weekend आहे खास, सोबत बहरलेला निसर्ग! पावसात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे फिरायला विसरू नका

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget