Monsoon Fashion : पावसाळ्यात दिसा स्टायलिश अन् कूल! 'हे' जंपसूट ठरतील उत्तम पर्याय, नवीन डिझाइन्स पाहा
Monsoon Fashion : पावसाळ्यात नेमके कोणते आऊटफिट्स घालावे, असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा या प्रकारचे जंपसूट उत्तम पर्याय ठरू शकतो.
Monsoon Fashion : पावसात फॅशन करणे थोडे कठीणच असते.. कारण कामानिमित्त जेव्हा बाहेर पडावे लागते, तेव्हा अचानक पाऊस आला तर कपडे भिजतात, केलेली फॅशन बिघडते.. मग पावसाळ्यात असे कोणते कपडे घालावे? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. पण चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला मान्सून फॅशन आऊटफिट्सचे असे काही पर्याय सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल, आणि स्टायलिशही दिसाल....
पावसाळ्यात कोणते आऊटफिट्स घालावे?
पावसाळ्यात जेव्हा कोणते आऊटफिट्स घालावे, असा प्रश्न पडतो, तेव्हा बऱ्याच प्रसंगी घालण्यासाठी जंपसूट हा उत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहता, त्यामध्ये तुम्ही स्टायलिशही दिसता. तुम्हाला बाजारात अनेक रंगांचे आणि डिझाइन्सचे जंपसूट मिळतील, पण तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या फ्लोरल प्रिंटेड जंपसूटला स्टाइल करू शकता. या प्रकारचा जंपसूट पावसाळ्यात घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट डिझाईन केलेल्या फ्लोरल प्रिंट जंपसूट आणि त्यांची स्टाईल कशी करावी? याबद्दल सांगत आहोत. हे आऊटफिट्स तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता आणि या फ्लोरल प्रिंट जंपसूटमध्येही तुम्ही स्टायलिश दिसाल.
पॉलिस्टर फ्लोरल प्रिंट जंपसूट
स्टायलिश लूकसाठी तुम्ही या प्रकारचे पॉलिस्टर फ्लोरल प्रिंट जंपसूट घालू शकता. हा जंपसूट व्ही-नेक डिझाइनमध्ये आहे आणि त्याच्या अर्ध्या बाही आहेत. या प्रकारच्या जंपसूटसह तुम्ही फूटवेअरमध्ये हील्स घालू शकता आणि हा जंपसूट तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. या दोन्ही ठिकाणांहून तुम्ही हा जंपसूट रु 1000 पर्यंतच्या किमतीत खरेदी करू शकता.
रेयॉन प्रिंटेड फ्लोरल जंपसूट
या प्रकारचा रेयॉन प्रिंटेड फ्लोरल जंपसूट तुम्ही अनेक प्रसंगी घालू शकता. हा जंपसूट रेयॉन फॅब्रिकचा बनलेला आहे आणि परिधान करण्यास खूपच आरामदायक आहे. या आउटफिटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी हील्स घालू शकता. तुम्ही हा पोशाख बाजारातून खरेदी करू शकता आणि हा जंपसूट तुम्ही 700 रुपयांपर्यंतच्या किमतीत ऑनलाइनही खरेदी करू शकता.
चंदेरी जंपसूट
या प्रकारचा चंदेरी जंपसूट तुम्ही आऊटिंगमध्ये किंवा कोणत्याही पार्टीमध्ये घालू शकता. या जंपसूटसह तुम्ही फ्लॅट्स घालू शकता आणि शूज देखील या आउटफिटसह स्टाईल करण्यासाठी योग्य पर्याय असू शकतात. तुम्हाला हा चंदेरी जंपसूट ऑनलाइन तसेच ऑफलाइन मिळेल, तुम्ही 1000 रुपयांपर्यंत कमी किमतीत या प्रकारचे चंदेरी जंपसूट खरेदी करू शकता.
हेही वाचा>>>
Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )