एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Malavi Mango: कोकणातून 13 वर्षांपूर्वी आफ्रिकेत हापूस आंब्याची रोपं नेली अन्... महागडा 'मलावी हापूस' मुंबईच्या बाजारपेठेत दाखल! जाणून घ्या...

Malavi Mangoes: या आंब्याबद्दल विशेष गोष्ट ती अशी की, मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. मग याला आफिक्रेचा मलावा आंबा असं का म्हणतात? जाणून घ्या...

Malavi Mangoes: आंबे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं.. नाही का..? आंबा हे असं फळ आहे, जे कोणाला आवडत नाही असे शक्यचं नाही. म्हणून आंबे खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आफ्रिकन देश मलावीमधून (Malawi) हापूस आंबा (Alphonso Mango) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) मलावी देशातून या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. हा आंबा मुंबई, पुणे, अहमादाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. या आंब्याबद्दल विशेष गोष्ट ती अशी की, मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. मग याला आफिक्रेचा मलावा आंबा असं का म्हणतात? जाणून घ्या...

महाराष्ट्र-गुजरातमध्ये या आंब्याला मोठी मागणी 

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. आफ्रिकेतील मलावी देशातून आलेला हा हापूस आंबा तसेच दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे आता मुंबईत दाखल झाले आहेत. डिसेंबरअखेर या विशेष जातीच्या आंब्यांची आयात सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत. 

यंदा मलावी आंब्याचा हंगाम लांबला?

मलावी देशातील हापूस आंब्याला भारतातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यावर्षी देखील मलावीमधून हापूस आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत दाखल झाला आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मालावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मलावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे.

आफ्रिकेचा मलावा आंबा मूळ कोकणातला?

या मलावी आंब्याबद्दल सांगायचं म्हणजे, स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, हा आंब्याचा थेट संबंध कोकणच्या मातीशी आहे, माहितीनुसार, या मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. साधारण बारा वर्षांपूर्वी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या रत्नागिरीतून मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून आफ्रिकेत सुमारे 26 एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाल्याचे सांगण्यात येते. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते.  2018 मध्ये आफ्रिकेतील हे मलावी हापूस आंबे पहिल्यांदा वाशी बाजार समितीत आले होते. त्यानंतर मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहते.

मलावी आंब्याचा भाव काय? 

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे.  या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या आंब्याला एक किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे. दर्जानिहाय मालावी हापूसला प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा>>>

Travel: 'रेल्वेचं 'तत्काळ' तिकीट बुक करण्यात अडचण येतेय? 'या' प्रो टिप्स ठरतील उपयुक्त, लगेच जाणून घ्या..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Embed widget