Kitchen Tips : सणासुदीच्या दिवसांत मिठाई खाऊन कंटाळलात? घरच्या घरी फळं आणि ड्रायफ्रूट्सची 'ही' स्वादिष्ट रेसिपी ट्राय करा
Kitchen Tips : ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जी आरोग्यासाठी आवश्यक असतात.
Kitchen Tips : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं (Ganesh Chaturthi 2023) वातावरण आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दिवाळी, दसरा अशा अनेक सणांची रीघ लागणार आहे. आता सणासुदीचे दिवस म्हटले की गोडाचे पदार्थ आलेच. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाऊन कंटाळा आला असेल तर या ठिकाणी आम्ही तु्म्हाला फळे आणि ड्रायफ्रुट्सच्या मदतीने अशा काही सोप्या रेसिपी सांगणार आहोत ज्याने तुमचं मनही खुश होईल आणि काहीतरी नवीन खाल्ल्याचा अनुभवही मिळेल. हे पदार्थ कोणते आणि ते बनविण्याची पद्धत कशी आहे ते जाणून घेऊयात.
ड्रायफ्रूट्स आणि फळांचं कस्टर्ड
हे कस्टर्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या फळांचा देखील वापर करू शकता. यासाठी 1 लिटर दूध मंद आचेवर उकळवा. दूध थंड झाल्यावर त्यात कस्टर्ड पावडर आणि साखर घालून मिक्स करा. त्यात द्राक्षे आणि डाळिंबाचे दाणे मिक्स करा. नंतर बारीक कापलेल्या ड्रायफ्रुट्सने तुमची डिश सजवा. तुमचं ड्रायफ्रूट्स आणि फळांचे कस्टर्ड सोपं कस्टर्ड आहे.
स्ट्रॉबेरी-काजू मिल्कशेक
स्ट्रॉबेरी आणि काजू मिल्कशेक खूप चविष्ट लागते. हे मिल्कशेक बनवायलाही खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला ब्लेंडरमध्ये अर्धा कप काजूची बारीक पेस्ट तयार करावी लागेल. आता त्यात दूध आणि साखर घाला. हे मिश्रण नीट ढवळा. आता स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि व्हॅनिला आइस्क्रीमचे काही स्कूप त्यामध्ये घाला. तुमचा चवदार स्ट्रॉबेरी आणि काजू मिल्कशेक तयार आहे.
केळी आणि अक्रोड केक
हा केक बनवण्यासाठी तुम्ही पिकलेली केळी आणि अक्रोड वापरू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी केळ्याची पेस्ट तयार करा. त्यात बटर, अक्रोड आणि साखर घालून चांगले फेटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणात थोडे दूधही घालू शकता. जर हे मिश्रण तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता. आता ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा. तुमचा केळी आणि अक्रोड केक तयार आहे. हा केक घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच खायला खूप आवडेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :