एक्स्प्लोर

Travel : एक नयनरम्य अनुभव! हिमाचलची सुंदर व्हॅली 'ही' स्वर्गापेक्षा कमी नाही, शुभ्र पाण्याचे धबधबे तुम्हाला घालतील भुरळ! 

Travel : हिमाचल प्रदेश पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील सुंदर दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात.

Travel : भारतातील हिमालच प्रदेश (Himachal Pradesh) हा एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही असे म्हणतात. कारण याला निसर्गाचं वरदान लाभलंय. हिमाचल प्रदेश पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथील सुंदर दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. तुम्हाला माहित आहे का? हिमाचल मध्ये एक सुंदर दरी म्हणजेच ज्याला व्हॅली म्हणतात, तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून तुमचं मनही मोहून गेल्याशिवाय राहणार नाही. किन्नोर व्हॅली हिमाचलमधील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. जिथली स्वर्गीय दृश्ये तुम्हाला मोहून टाकतील, इथले नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि अध्यात्मिक वातावरण तुम्हाला भुरळ घालते. 

हिमालयाच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली किन्नौर व्हॅली

हिमाचल प्रदेशातील किन्नौर व्हॅली ही हिमालयाच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली आहे. किन्नौर हे हिमाचलमधील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. जिथे तुम्ही पर्वत, बर्फाच्छादित शिखरे, फळांनी भरलेली झाडे आणि डोंगराळ जंगले पाहू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावल्यानंतर पंजाबी गायक दिलजीत दोसांझही काही दिवसांनी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. दिलजीतने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ज्यात तो किन्नौरच्या संस्कृतीचा आनंद घेताना दिसत होता. तुम्हालाही तिथे जायचे असेल, तर तिथपर्यंत कसे पोहोचायचे आणि कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

किन्नौरला जाण्यासाठी कोणता महिना चांगला?

किन्नौरला भेट देण्यासाठी मध्य एप्रिल ते जून हे महिने खूप चांगले मानले जातात. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तुम्ही किन्नौरला देखील भेट देऊ शकता. किन्नौरला जाण्यासाठी तुम्ही विमानाने शिमला किंवा चंदीगडला जाऊ शकता आणि तिथून बस किंवा कारने घाटीत पोहोचू शकता. किन्नोरमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. येथे तुम्ही होमस्टे, गेस्टहाऊस किंवा लक्झरी हॉटेलमध्ये राहू शकता. पण किन्नौरला जाताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की नॉन-हिमाचल लोकांना इथे जाण्यासाठी इनर लाईन परमिट घ्यावे लागेल.

किन्नौरमध्ये तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता

डोंगराच्या मधोमध वसलेल्या दरीत वाहणारे मंद वारे, छोटी स्वच्छ गावे, धबधबे... तुम्हाला भुरळ घालायला पुरेसे आहेत. या ठिकाणी शांतपणे वाहणाऱ्या सतलज नदीच्या काठावर एकांतात बसणे हे एखाद्या ध्यानापेक्षा कमी नाही.

किन्नौरमध्ये अनेक छोटी गावे आहेत आणि प्रत्येक गाव दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे. किन्नौरमध्ये तुम्ही कामरू किल्ल्यावर जाऊ शकता जिथे अनेक बौद्ध मठ आहेत.

ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी किन्नौर हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही रुपिन पास मध्ये ट्रेक करू शकता, जो एक अतिशय सुंदर बर्फाच्छादित प्रदेश आहे. तुम्ही इथल्या सफरचंदाच्या बागांमध्ये फिरून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

किन्नोरची खाद्यसंस्कृती कशी आहे?

किन्नौरमध्ये तुम्ही स्थानिक जेवणाचा आनंद घेऊ शकता. तिबेटचा प्रभाव येथील खाद्यपदार्थांवर दिसून येतो. तुम्ही येथे वाफवलेले बन्स (सिद्दू), नूडल्स सूप (थांग) आणि लँब करी (छा गोश्त) चा आनंद घेऊ शकता. सफरचंद, प्लम, जर्दाळू यांसारखी फळे झाडांवरून तोडून खाण्यास विसरू नका.

 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Summer Tour : काय झाडी.. काय डोंगर..! भारतातील नगण्य प्रदूषण असणारी 'ही' शहरं माहित आहेत? सौंदर्याला भूरळ पडेल

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget