Late Motherhood Challenges: कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
Late Motherhood Challenges: गेल्या काही दिवसांमध्ये कतरिना कैफ सार्वजनिक ठिकाणी अत्यंत सांभाळून चालत असलेलं चाहत्यांनी हेरलेले आणि तेव्हापासूनच ती गरोदर असल्याच्या चर्चा होत्या

Katrina Kaif Pregnant: बॉलीवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक असणाऱ्या विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. या दाम्पत्याच्या घरी पाळणा हलणार असल्याची गोड बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. यानंतर कतरिना आणि विकीच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. कतरिना कैफच्या या बाळंतपणाच्यानिमित्ताने (Pregnancy) सोशल मिडीयावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ हिचे वय सध्या 42 वर्षे इतके आहे. सर्वसामान्यांच्या घरात इतक्या उशीरा बाळंतपण होणे, ही तशी सामान्य बाब नाही. ही गोष्ट एकप्रकारचा टॅबू मानला जातो. मुळात इतक्या उशीरा एखाद्या जोडप्याला बाळ होऊ शकते, हीच बाब अनेकांच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे साधारण महिलांची पस्तीशी उलटली आणि तिला बाळ झाले नाही तर नंतर तिला मूल होण्याची शक्यता कमी असते, असा एक समज आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या बाळंतपणाच्यानिमित्ताने चाळिशी उलटल्यावरही स्त्रियांना आई होता येऊ शकते, या विषयावर एक सकारात्मक चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु झाली आहे.
Late Motherhood: वयाच्या चाळिशीनंतर आई होण्यात काय अडचण येते?
अनेक जोडपी चाळिशीच्या आसपास पोहोचल्यानंतर महिलांना आई होण्यात बऱ्याचदा अडचण येते. आपल्याकडे प्रचलित असलेल्या मान्यतेनुसार, महिलांच्या वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर त्यांच्यातील गर्भधारणेची क्षमता कमी कमी होत जाते. त्यांची फर्टिलिटी लेव्हल कमी होत गेल्याने चाळीशीत गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते. चाळिशी उलटल्यानंतर महिलांच्या शरीरातील बीजांडांची गुणवत्ता घटते आणि त्यांची संख्याही कमी झालेली असते. त्यामुळे बाळ होण्यात अनेक अडचणी येतात. महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो किंवा त्यांना आयव्हीएफसारख्या पद्धतींचा वापर करावा लागतो. याशिवाय, वयाच्या चाळिशीपर्यंत अनेकांना मधूमेह, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधी होतात. त्यामुळे चाळिशीनंतरच्या गर्भधारणेत प्री-मॅच्युअर डिलिव्हरी किंवा अर्भकांमध्ये क्रोमोसोमल डिसऑर्डर यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सामान्य घरांमध्ये चाळिशीनंतरची गर्भधारणा ही जवळपास निषिद्ध मानली जाते.
Pregnancy after 40: जोडप्यांना चाळिशीनंतर बाळ होण्याबाबत डॉक्टरांचं मत काय?
हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे बहुतांश लोकांना वयाची 40 वर्षे होईपर्यंत आरोग्याच्या वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात. त्यामुळे चाळीशीत गर्भवती असलेल्या महिलांना डॉक्टर हाय-रिस्क कॅटेगरीत ठेवतात. चाळिशीनंतर आई व्हायचे असेल तर सर्वप्रथम त्या महिलेचे आरोग्य तंदुरुस्त राहिले पाहिजे. जेणेकरुन गर्भधारणेनंतर त्या महिलेच्या आरोग्याला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही. अमेरिकन गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. मिशेल ओवेन्स यांच्या मतानुसार, चाळिशीनंतरची गर्भधारणा अत्यंत कठीण असते. त्यामुळे गर्भपात किंवा अर्भकाच्या मृत्यूची शक्यता असते. मात्र, अलीकडच्या काळात वैद्यकशास्त्र प्रगत झाल्याने चाळिशीनंतर गर्भवती होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे.
आणखी वाचा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























