Janmashtami 2024 Travel : जेथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घाव ठरला निरर्थक! भारतातील राधाकृष्णाचे एक चमत्कारिक मंदिर, जन्माष्टमीनिमित्त इतिहास जाणून घ्या
Janmashtami 2024 Travel : मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, मुघल राजवटीत या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. पण, मंदिर पाडता आले नाही.
Janmashtami 2024 Travel : भारतात अनेक पौराणिक जुनी मंदिरं आहेत, ज्यापैकी अनेक मंदिर ही चमत्कारी मानली जातात. आज कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने आज आपण भारतातील अशा एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. जे हिंदू धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान मानले जाते.
मुघलांनी या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला केला, इतिहास काय सांगतो?
इतिहास जर पाहिला तर भारतात राधा-कृष्णाची शेकडो वर्षे जुनी मंदिरं आहेत. ज्यांना नष्ट करण्यासाठी मुघलांनी आक्रमण केले होते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे असे एक मंदिर आहे, जिथे दर्शन घेतल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जन्माष्टमीनिमित्त येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्षे येथे देखावा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी केवळ फिरोजाबादहूनच नव्हे तर दूरदूरहून भाविक येतात. राधा-कृष्ण मंदिराचे पुजारी विजय कुमार उपाध्याय म्हणतात की, हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे. अनेक चमत्कारही इथे पाहायला मिळतात. पुजाऱ्याने सांगितले की 1662 मध्ये भारतात मुघल राजवटीत या मंदिरावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. पण, मंदिर पाडता आले नाही. कुऱ्हाडीच्या खुणा इथे अजूनही दिसतात.
शहरातील शुभ कार्याला इथून होते सुरुवात...
पुजारी सांगतात की, या मंदिराची शहरात सर्वाधिक ओळख आहे. शहरात कोणताही शुभ कार्यक्रम सुरू झाला की, भाविक प्रथम राधा आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येतात. इतकंच नाही तर शहरातील कोणत्याही उत्सवाची सुरुवात या मंदिरातून सुरू होते. शहरातील कोणत्याही उत्सवाची मिरवणूकही याच मंदिरातून सुरू होते. ज्यामुळे इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते.
रतनकुंवर मातेने मंदिरासाठी मालमत्ता दान केली
मंदिराच्या पुजाऱ्याचे म्हणणे आहे की, फिरोजाबाद येथे रतनकुंवर नावाची महिला राहत होती, जिच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. त्यांनी प्रसिद्ध आणि प्राचीन राधा-कृष्ण मंदिरासाठी देणगी दिली होती. त्यानंतर या मंदिराचे भव्य बांधकाम पूर्ण होऊ शकले. त्यांची मूर्ती आजही मंदिरात स्थापित आहे. येथे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जन्माष्टमीनिमित्त मंदिराची भव्य आणि सुंदर सजावट करण्यात आली आहे. यासोबतच आग्रा, इटावा, दिल्ली येथील लोक दर्शनासाठी येतात.
हेही वाचा>>>
Janmashtami 2024 Decoration : यंदा जन्माष्टमीला नेहमीपेक्षा वेगळं डेकोरेशन करायचंय? लाडक्या बालगोपाळासाठी करा 'अशी' आकर्षक सजावट, लोकं म्हणतील, वाह..!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )