(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Citizenship : जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाचं मूल भारतात जन्मलं तर त्याला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळेल?
परदेशी नागरिकाचे मूल भारतात जन्माला आले तर त्याला भारताचे नागरिक मानले जाईल का? असा प्रश्न पडला असेल. आम्ही तुम्हाला भारतातील नागरिकत्वाशी संबंधित नियम आणि कायद्यांबद्दल सांगणार आहोत..
Indian Citizenship : जगातील विविध देशांमध्ये नागरिकत्वासाठी (Indian Citizenship ) वेगवेगळे नियम आहेत. भारतातही नागरिकत्वासंदर्भात काही नियम करण्यात आले आहेत, ज्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व दिले जाते. पण आता प्रश्न असा पडतो की, परदेशी नागरिकाचे मूल भारतात जन्माला आले तर त्याला भारताचे नागरिक मानले जाईल का? यात आम्ही तुम्हाला भारतातील नागरिकत्वाशी संबंधित नियम आणि कायद्यांबद्दल सांगणार आहोत.
जन्मानुसार नागरिकत्व
तुम्हाला जन्माच्या आधारावर नागरिकत्व मिळेल. भारतीय कायद्यानुसार 26 जानेवारी 1950 नंतर जन्मलेले आणि 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेले लोक भारतीय नागरिक मानले जातात. आई-वडिलांचे नागरिकत्वाचे ठिकाण कुठेही असले तरी चालेल. 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 या कालावधीत जन्मलेल्या आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय नागरिक असेल तर त्यालाही भारतीय नागरिक मानले जाते. 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली व्यक्ती, जर आई-वडील दोघेही भारतीय नागरिक असतील किंवा किमान एक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर तो अजूनही भारताचा नागरिक आहे.
नोंदणी प्रक्रियेद्वारे नागरिकत्व
-नोंदणीद्वारेही भारतीय नागरिकत्व मिळवता येते, ज्याचे नियम निश्चित आहेत.
-किमान 7 वर्षे येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना नागरिकत्व मिळू शकते.
-नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी भारतीय नागरिकाशी विवाह केलेल्या आणि किमान 7 वर्षे भारतात वास्तव्यास असलेल्या व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.
वंशानुसार नागरिकत्व
-26 जानेवारी 1950 नंतर परदेशात जन्मलेल्या, परंतु त्यांचे आई-वडील भारतीय नागरिक असलेल्या व्यक्ती भारतीय नागरिक असू शकतात.
-10 डिसेंबर 1992 नंतर परदेशात जन्मलेल्या आणि 3 डिसेंबर 2004 पूर्वी परदेशात जन्मलेल्या परंतु त्यांच्या पालकांपैकी कोणीही एक पालक भारतीय नागरिक असेल तर त्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं.
-3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मात्र पालकांनी जर पासपोर्ट नसल्याचं सांगितलं तर त्यांना भारतीय दूतावासात नोंदणी करावी लागले. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर भारताचं नागरिकत्व मिळू शकतं.
- जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला भारतात मुल जन्मलं तर त्यांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल किंवा त्यांना 7 वर्षे भारतात वास्तव्यास आहे, याचा पुरावा द्यावा लागेल.
इतर महत्वाची बातमी-