(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day Baby Photoshoot : स्वातंत्र्यदिन निमित्त मुलांचे फोटोशूट करायचंय? ट्रेंडमध्ये असलेल्या 'या' भन्नाट आयडिया जाणून घ्या
Independence Day : पालकांना त्यांच्या मुलाच्या जन्मापासूनच्या सर्व आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून टिपायच्या असतात. अशात स्वातंत्र्यदिनानिमित्त लहान मुलांचे फोटोशूटसाठीही लगबग पाहायला मिळत आहे.
Independence Day Baby Photoshoot : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतात सध्या देशभक्तीमय वातावरण निर्माण झालंय. आपल्या लहान मुलांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून बदलत्या काळानुसार पालकही विविध सणांना किंवा वाढदिवसाला विविध थीममध्ये फोटोशूट करतात. सध्या लहान मुलांचे फोटोशूट ट्रेंडमध्ये आहे. पालकांना त्यांच्या मुलाच्या जन्मापासूनच्या सर्व आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून टिपायच्या असतात. अशात सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटोशूट पाहायला मिळत आहे. मुलाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल तर वर्षभर साजरा होणारा प्रत्येक सण विविध थीमव्दारे साजरी करण्याची उत्सुकता असते, कारण हा तुमच्या मुलाचा पहिला सण असतो
आता 15 ऑगस्टचा सण असो किंवा रक्षाबंधन, तुमच्या मुलाचा पहिला सण असेल तर फोटोंच्या माध्यमातून आठवणी ठेवता येईल. यानिमित्ताने थीमनुसार फोटोशूट करून घ्या. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा सण साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलाचे अप्रतिम फोटोशूटही करता येईल. छोट्या देशभक्ताचे फोटो बघून सगळ्यांना कौतुक वाटेल. 15 ऑगस्ट रोजी मुलांच्या फोटोशूटसाठी येथे काही उत्कृष्ट कल्पना आहेत, ज्याचा अवलंब केल्यास त्यांचे फोटो संस्मरणीय आणि मजेदार बनवता येईल.
तिरंगा रंगाचे कपडे
स्वातंत्र्य दिनानिमित्त योग्य कपडे बाजारात लहान मुलांसाठी सहज उपलब्ध होतील. मुलासाठी तिरंगा प्रिंट टी-शर्ट, कुर्ता पायजमा इत्यादी आणू शकता. फोटोशूटसाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, प्रसंगानुसार त्यांना तिरंगा रंगाचे कपडे घाला आणि त्यांच्या हातात एक छोटा ध्वज देऊन फोटो क्लिक करा.
कपड्यांसोबतच घराची सजावटही स्वातंत्र्य दिनाच्या थीमवर ठेवता येते. तुम्ही भगवे, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे फुगे सजवू शकता आणि त्यांच्यामध्ये खेळत असलेल्या मुलाचा फोटो क्लिक करू शकता. तुमच्या मुलासोबत तिरंग्याचा रंगही अगदी खुलून येईल, अशा थीममध्ये फोटोही खूप सुंदर दिसतील.
भारतमातेचा लूक
स्वातंत्र्यदिन निमित्त तुमच्या लहान मुलाचे फोटोशूट करायचे असल्यास, गडद रंगाची चादर पसरवा आणि मुलाला त्यावर झोपवा. फुले आणि पाने घालून तिरंगा ध्वज बनवा. तुम्ही वर दाखवण्यात आलेल्या फोटोप्रमाणे आय लव्ह इंडिया देखील लिहू शकता. जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही तिला दुपट्ट्यासह साडी नेसवू शकता. भारतमातेचा लूक तुमच्या मुलीवर खूपच क्यूट दिसेल.
तुमच्या मुलाला भारत माता बनवता येत असेल तर तुमच्या मुलाला लष्करी वेशभूषा करता येईल. देशाचा सैनिक बनून तुमचं मूल सर्वांची मने जिंकेल. तिरंग्याच्या मधोमध त्याचे असे फोटो खूप सुंदर दिसतील
थोडी रचनात्मकता आणून तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याची थीम अधिक आकर्षक बनवू शकता. मुलाला तिरंगा स्कार्फमध्ये गुंडाळा. तुम्ही आजूबाजूला तीन रंगांचे कागदी पक्षी बनवू शकता. तुम्ही भारताचा ध्वज किंवा नकाशा सजवू शकता.
हेही वाचा>>>
Independence Day Rangoli : स्वातंत्र्याचा दिवस भाग्याचा! 15 ऑगस्टनिमित्त घर, ऑफिसमध्ये 'या' झटपट रांगोळी डिझाइन काढा, कौतुकाचे बोल मिळवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )