एक्स्प्लोर

Important Days in December 2022 : महापरिनिर्वाण दिन, वर्षातील शेवटचा महिना यांसह डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

Important Days in December 2022 : डिसेंबर महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. डिसेंबर महिना हा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे.

Important Days in December 2022 : डिसेंबर महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. डिसेंबर महिना हा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. कारण याच महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ग्राहक दिन देखील याच महिन्यात असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर महिना हा वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे नाताळ बरोबरच अनेक समारंभाला सुरुवात केली जाते. त्याचबरोबर या महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस देखील या महिन्यात येतात. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घ्या. 

1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन (World Aids Day) :

जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो.

1 डिसेंबर : उदित नारायण 

उदित नारायण झा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक आहेत. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानच्या अनेक गाण्यांना उदित नारायण यांचा आवाज आहे.  

2 डिसेंबर : जागतिक संगणक साक्षरता दिन  (World Computer literacy day) :

भारतीय संस्था एनआयआयटीने 2001 साली जागतिक संगणक साक्षरता दिनाची सुरुवात केली. जागतिक संगणक साक्षरता दिनाला यावर्षी 22 वर्ष पूर्ण होत आहेत. संगणक आणि तंत्रज्ञानाविषयी डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी 2 डिसेंबर रोजी हा दिन पाळला जातो. चार्ल्स बॅबेज जे एक ब्रिटिश गणितज्ज्ञ आणि एक अभियंता होते. त्यांच्या कल्पनांनी संगणकाच्या शोधाचा मार्ग तयार करण्यात मदत झाली आणि जगातील पहिले संगणक तयार झाले. 

3 डिसेंबर : जागतिक अपंग दिन 

जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

4 डिसेंबर : नौदल दिन (Navy Day) :

भारतात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. या दिवशी 1971 च्या युध्दात भारतीय नौदलाने पाकिस्तानला धूळ चारली होती. त्याच विजयाच्या स्मरणार्थ भारतात 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्कराने हल्ला केला. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतरच 1971 सालच्या युध्दाला तोंड फुटलं. पाकिस्तानच्या या आगळीकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरु केलं.

6 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 

6 डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र येतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झालं होतं. तेव्हापासूनच हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून पाळला जातो.

7 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन (International Civil Aviation day) :

इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी जगाच्या विविध भागात हा दिवस साजरा करते. 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाची स्थापना करण्यात आली. यूएन जनरल असेंब्लीने संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये 1996 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिवस म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली. दरम्यान भारतात नागरी विमान वाहतूक 18 फेब्रुवारी 1911 रोजी सुरू झाली होती.

7 डिसेंबर : श्रीदत्त जयंती 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

8 डिसेंबर : गुजरात हिमाचल मतमोजणी

हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. आता गुजरात विधानसभेसाठी 1 डिसेंबर रोजी पहिल्या आणि 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांची मतमोजणी होणार आहे.

8 डिसेंबर : धर्मेंद्र यांचा वाढदिवस 

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. इ.स. 1960 साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने 2011 सालापर्यंत 247 चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे ते अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होते. सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल ही त्यांची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.

9 डिसेंबर : The International day against corruption

भ्रष्टाचार ही सर्वात जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांपैकी एक आहे, ज्याने जगातील सर्व देशांना प्रभावित केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. जगातील जवळपास सगळेच देश भ्रष्टाचाराच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने 31 ऑक्टोबर 2003 रोजी एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर दरवर्षी 9 डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 

10 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (Human Rights Day)

जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 1950 सालापासून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असं संयुक्त राष्ट्रसंघटनेनं स्पष्ट केलं होतं. या दिवसासाठी 10 डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे 1948 साली याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक घोषणा पत्र जाहीर केलं होतं. हे घोषणा पत्र जगभरातल्या 500 पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत आहे.

11 डिसेंबर : संकष्ट चतुर्थी 

मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. यंदा संकष्टी चतुर्थी गुरुवारीर, 11 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. या वेळी चंद्रयोग 08.40 आहे.

11 डिसेंबर : International Mountain day

जगभरातील 15 टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्गसंपदेने संपन्न आहे. केवळ यासाठीच या प्रदेशाचं जतन करणं आवश्यक नाही तर इतर भागातील लोकसंख्येसाठीही पर्वतीय प्रदेश महत्वाचा आहे. त्यामुळे पर्वतांच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या विषयी जागरुकता वाढवण्यासाठी 11 डिसेंबर हा दिवस 'आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस' म्हणून साजरा केला जातो.

12 डिसेंबर : रजनीकांत यांचा जन्मदिन 

रजनीकांत ह्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे मराठा हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत.

18 डिसेंबर : पार्श्वनाथ जयंती (जैन)

भगवान पार्श्वनाथ जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर मानले जातात. त्यांच्या जन्म अरिष्टनेमिच्या एक हजार वर्षांनी इश्वाकू वंशात पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला झाला होता. त्यांना तीस वर्षाचे असताना एक दिवस राज्यसभेत 'ऋषभदेव चरित' ऐकून वैराग्य प्राप्त झाले.

18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन (International Migrants Day) :

जागतिक शांततेसाठी, कामाच्या शोधात किंवा इतर कारणांमुळे इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या लोकांच्या समस्या गांभीर्याने समजून घेणे आणि सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस 2021 दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना शिक्षित करणे हा आहे की प्रत्येक स्थलांतरित व्यक्तीशी आदराने वागणे ही मूलभूत गरजांपैकी एक आहे.

19 डिसेंबर : गोवा मुक्ती दिन (Goa’s liberation day) :

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे म्हणतात. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण आणि दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा आणि नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे 450 वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो.

23 डिसेंबर : वेळा अमावस्या (येळवस)

वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.

23 डिसेंबर : किसान दिन 

किसान दिन हा दरवर्षी भारतात 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

24 डिसेंबर : भारतीय ग्राहक दिन 

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

25 डिसेंबर : नाताळ

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘25 डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस 25 डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. 

26 डिसेंबर : विनायक चतुर्थी 

विनायक चतुर्थी ही कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. श्री गणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत केले होते.

31 डिसेंबर : वर्षातील शेवटचा दिवस 

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. 345 वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘25 डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस 25 डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget