एक्स्प्लोर

Hug Day 2025 : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा! प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग, 'हग डे'

Valentine week 2025 : एखाद्याच्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात, मग आवडत्या व्यक्तीला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो. 

Hug Day 2025 : प्रेम व्यक्त करताना काही वेळा शब्द अपुरे पडतात, काही वेळा मनात असूनही भावना व्यक्त करता येत नाहीत. काही वेळा प्रेमात नुसता चंद्र-सुर्यांच्या कल्पना करता-करता वेळ निघून जाते. मनाची तगमग सुरू होते आणि मग एक वेळ अशी येते की हे सारं थांबवावं, ही कोंडी फोडावी. अशावेळी मग ती कुसुमाग्रजांची कविता आठवावी. 'मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा. सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.' प्रेम व्यक्त करण्याचा 'मिठी' हा एक निशब्द मार्ग आहे.

प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबी महिना म्हणजे फेब्रुवारी. कारण तरुणांचा आवडता आंतरराष्ट्रीय सन म्हणजे वॅलेंटाईन डे याच महिन्यात असतो. त्यासाठी आठवडाभर वॅलेंटाईन वीकचा (Valentine's Week) भरगच्च कार्यक्रम (Valentine Week Days List 2025) आखला गेला आहे. या वॅलेंटाईन वीक मध्ये आतापर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि प्रॉमिस डे पार पडले आहेत. आता याच्या पुढचा अंक म्हणजे 'हग डे', अर्थात मिठी दिवस.

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख ते काय असेल. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस खासच आहे.

वॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे 'हग डे', जो सर्व प्रकारच्या नात्यात गोडवा निर्माण करू शकतो. प्रत्येक वर्षी 12 फेब्रुवारीला 'हग डे' साजरा करण्यात येतो.

'जादू की झप्पी'ची ताकत

मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील जादूची झप्पी आपण पाहिलीच आहे. त्यावरुन एका मिठीत किती ताकत असते याची प्रचिती येते. मिठी मारल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा रागही कमी होतो, प्रेमही वाढते.

भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग (Hug Day 2025) 

अनेकदा अनेकांना आपले प्रेम आणि आपल्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत. मग त्यांची प्रचंड कोंडी होते, अस्वस्थता वाढते. मग त्या भावना व्यक्त करण्यासाठी धाडस करावं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारावं. एखाद्याच्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात. मग एखाद्याला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.

मिठी मारल्याने तणाव कमी होतो

एखाद्याला मिठी मारल्याने समोरच्या व्यक्तीचा तणाव कमी होण्यास मदत होते. एखादा व्यक्ती मानसिक तणावात असेल आणि त्याला कोणीतरी मिठी मारली तर त्याच्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन तयार होते आणि ते रक्तात मिसळते असं विज्ञान सांगतंय. त्यामुळे त्या व्यक्तीचा ताण निवळण्यास मदत होते. तसेच या हार्मोनमुळे रक्त दाब कमी होतो, हृदयासंबंधी आजारही कमी होतात. रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढते, मूड फ्रेश होतो आणि मनात आपलेपणाची भावना निर्माण होते ती वेगळीच.

मिठी मारणे म्हणजे प्रेम अन् काळजी

मिठी मारणे म्हणजे काळजी, प्रेम व्यक्त करणे. एखाद्या व्यक्तीला एकाकीपणा वाटत असेल तर त्याला मिठी मारल्याने त्याचा एकाकीपणा दूर होतो, त्याचं नैराश्य कमी होतं. मिठी मारल्याने नात्यातील गोडवा वाढतो. प्रेमाची अप्रतिम भावना म्हणजे मिठी होय. त्यामुळे आपले प्रेम, मित्र, परिवार आणि इतर लाडक्या लोकांना आजच्या दिवशी मिठी मारा आणि आपुलकीची भावना वाढावा.

प्रेमाविरांसाठी आजचा दिवस खास. आजच्या दिवसाच्या माध्यमातून त्याने किंवा तिने आपल्या प्रेमाला आपण आयुष्यभर तुला साथ देणार, तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात सामील असणार, आपल्या या कोवळ्या नात्याला आयुष्यभर जपणार असा दृढविश्वास दिला पाहिजे. अशी एक संधी 'हग डे' च्या माध्यमातून चालून आली आहे. तर प्रेमाविरानो, ही संधी गमावू नका.

सांग तिला,तुझ्या मिठीत आहे जग सारा..... असं सांगत कवी कुसुमाग्रजानी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रेमविरांना आवाहन केलंच आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
Health Tips : सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
Health Tips : भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget