(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakshabandhan 2023 : यंदाच्या रक्षाबंधनाला 'या' 5 मिठाईने सणाचा आनंद द्विगुणित करा; आरोग्य जपा
Homemade Sweets For Rakshabandhan 2023 : या रक्षाबंधनाला बाजारातून मिठाई आणण्याऐवजी तुम्ही काही वेगळ्या आणि आरोग्यदायी पद्धतीने मिठाई तयार करू शकता.
Homemade Sweets For Rakshabandhan 2023 : आज सगळीकडे रक्षाबंधनचा (Raksha bandhan 2023) सण साजरा केला जातोय. भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा हा सण प्रत्येकासाठी खास आहे. सण म्हटला की, गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई यांसारख्या पदार्थांची चव हमखास जीभेवर रेंगाळते. भावाला राखी बांधल्यानंतर बहिण भावाला गोड मिठाई खाऊ घालते. पण अनेकदा ही मिठाई फार गोड असते, किंवा शिळी असते. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या आहारात आणि आरोग्याशी तडजोड करावी लागते. अशा परिस्थितीत जर काही मिठाई तुमही घरच्या घरी केल्या तर त्यामुळे तुमची हौसही भागेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. अशाच काही मिठाईबद्दल जाणून घेऊयात.
घरगुती पौष्टिक मिठाईची नावं खालीलप्रमाणे :
अंजीर बर्फी : अंजीर बर्फी ही अंजीरापासून बनवलेली स्वादिष्ट आणि पौष्टिक मिठाई आहे. अंजीरमध्ये सिट्युलिन, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आहारातील फायबर असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. अंजीर बर्फी तयार करताना साखरेऐवजी अंजीर वापरतात, ज्यामुळे ती बर्फी निरोगी आणि पौष्टिक होते.
ओट्स आणि ड्राय फ्रूट्स लाडू : ओट्समध्ये भरपूर फायबर असते आणि ड्राय फ्रूट्स चव आणि पोषण वाढवतात. ओट्स आणि ड्रायफ्रुट्स लाडू हे आरोग्यदायी आणि पौष्टिक मिष्टान्न आहे त्यामुळे तुम्ही लाडू देखील बनवू शकता.
चिया सीड्स पुडिंग : चिया सीड्समध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. दुधात किंवा नारळाच्या दुधात मिसळून ते रात्रभर भिजत ठेवल्यास ते फुगते आणि पुडींगसारखे तुम्ही करू शकता.
नारळ आणि खजूर बर्फी : खजूर मुळातच गोड असतात. नारळात खजूर मिक्स करून त्याची बर्फी केली तर ती आरोग्यासाठीही चांगली राहते.
हलवा : तुम्हाला हवे असल्यास, यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हाताने चविष्ट आणि आरोग्यदायी हलवा बनवून तुमच्या भावाचे तोंड गोड करू शकता. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला आवडेल अशी खीर बनवून किंवा हलवा बनवून हा दिवस तुम्ही खास बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बदामाचा हलवा, मूग डाळीचा हलवा, रवा हलवा किंवा अंजीरचा हलवा करू शकता. कमी साखरेचा वापर करून हलवा बनवला तर आरोग्यदायी ठरू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Raksha Bandhan 2023: भावाला राखी नेमकी बांधायची कधी? मुहूर्तावरून संभ्रमात आहात? तर जाणून घ्या