(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Summer Sweating Tips: उन्हाळ्यातील घामाच्या वासामुळे त्रस्त आहात? 'या' टीप्सचा करा वापर, तुम्हाला परफ्युमचीही पडणार नाही गरज
जर तुम्हाला उन्हामुळे जास्त घाम येत असेल, तर आता तुम्हाला घामाचा वास दूर करण्यासाठी दररोज परफ्यूम लावायची गरज नाही. यासाठी काही घरगुती टीप्सचा अवलंब केला, तर तुमची घामाच्या वासापासून सुटका होईल.
Summer Sweating Tips : सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कडक उन्हामुळे (Summer) अंगाला प्रचंड घाम येतो. या घामाच्या वासामुळे (Sweating) तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना प्रचंड त्रासदायक ठरू शकतं. उन्हाळ्यामध्ये घामाचा (Sweating in summer) येणारा वास येणं, ही सर्वसामान्य बाब आहे. पण हे बऱ्याच वेळा अत्यंत लाजिरवाणं कारण बनू शकतं. आपल्यातील बहुतांश लोक घामाचा वास येऊ नये म्हणून सुंगधी बॉडी स्प्रे आणि परफ्युमसारख्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट्स खूप महागडे असतात आणि याच्या अतिवासामुळे तुमच्या शरीराचं अनेक प्रकारे नुकसान होऊ शकतं. जर तु्म्ही घामाच्या वासामुळे त्रस्त असाल, तर बॉडी स्प्रे आणि परफ्युम ऐवजी काही खास घरगुती टीप्सचा अवलंब करायला हवं. यामुळे तुमच्या शरीरातील घाम आणि घामाचा वास निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.या घरगुती टीप्सचा उपयोग करून घामाच्या वासापासून तुमची सुटका होऊ शकते.
टोमॅटो
तुम्ही बाजारातून जे लाल लाल टोमॅटो विकत घेता त्याच्यामुळेही घामाचा त्रासदायक वास दूर करण्यास मदत मिळते. तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येत असेल, तर एका वाटीत टोमॅटोचा रस काढा. यानंतर हा रस अंडरआर्म्स आणि जास्त घाम येणाऱ्या शरीराच्या भागावर लावा. आठवड्यातून दो ते तीन वेळा टोमॅटोचा रस वापरल्यामुळे तुमच्या घामापासून कमी वास येऊ लागेल. तसंही टोमॅटोला अँटिसेप्टिक मानलं जातं. यामुळे घामाच्या वासाची निर्मिती करणाऱ्या बॅक्टेरियाचा नायनाट होतो आणि तुमच्या घामापासून वास येणं बंद होईल.
पुदीना
पुदीन्याला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळयात पुदीन्याची चहा पिल्यामुळे ताजंतवाणं वाटतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात पुदीन्याच सेवन करणं चांगलं असतं. पुदीन्याची काही पाने पाण्यात टाकून अंघोळ केल्यामुळे घामाच्या वासापासून सुटका मिळू शकते. यामुळे तुम्हाला ताजंतवाणंही वाटू लागेल. तसेच, पुदीन्यातील अँटिसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुण घामाच्या वास दूर करते आणि घामातील बॅक्टेरियाही नष्ट करतात.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामुळेही घामाचा वास दूर होतो. तुमच्या अंडरआर्म्सवर बेकिंग सोडा लावा आणि हा सोडा काही वेळसाठी तसंच राहू द्या. यानंतर ओल्या सुती कापडानं स्वच्छ करा. याशिवाय तुम्ही पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिळसळून याचा बॉडी स्प्रेसारखा वापर करू शकता. दिवसभरातून दोन ते तीन वेळा शरीराच्या ज्या भागातून घामाचा वास येतो त्याजागी स्प्रे करा आणि थोड्या वेळानं ओल्या कापडानं स्वच्छ करा. यामुळे तुमची काही दिवसामध्येच घामाच्या वासपासून सुटका होईल.
अॅपल व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर अर्थात सफरचंदाचा व्हिनेगरही अँटिसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे फायदेशीर ठरतो. या गुणधर्मामुळे तुमची घामाच्या वासापासून सुटका होऊ शकते. हे व्हिनेगर पाण्यात मिसळून घामाच्या जागी 15 ते 20 मिनिटांसाठी लावा आणि यानंतर स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमची घामाच्या वासापासून सुटका होण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )