एक्स्प्लोर

Heart Attack : ईसीजी जॅकेटचा शोध! हॉर्ट अटॅकचं निदान करणारं अनोखं उपकरण; सोलापुरातील डॉक्टरांचं संशोधन

Heart Attack ECG : सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे (Solapur Dr Gurunath Parale) यांनी हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे.

Heart Attack ECG : हृदयरोगाच्या (Heart Attack) समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे अगदी तरुणवयातील व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे (Solapur Dr Gurunath Parale) यांनी हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे. हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हे देखील प्रमुख कारण आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी (ECG). मात्र गाव-खेड्यात ईसजी मशीन देखील उपलब्ध नसतात. 

अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉ. गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे. हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे. सध्या बाजारात अनेक  उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. 

हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 LEAD ECG फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे. अद्याप ही हे उपक्रम निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर हे उपकरण बाजारात येईल. यासाठी जवळपास 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो अशी माहिती देखील डॉ. गुरुनाथ परळे यांनी दिली. हृदय रुग्णांसाठी हा जॅकेट दिलासादायक ठरणार आहे.  

1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर पॉईंट्स शोधण्यात आले

सध्याचे जर ईसीजी मशीन आपण पाहिले तर त्यामध्ये 12 पॉईंट हे रुग्णांना घरी कनेक्ट करणे शक्य नाही. किंवा चुकीचे कनेक्ट झाले तर डायग्नोसिस चुकीचे होऊ शकते. साधारणत: ईसीजी करताना छाती, हात आणि पायांवर देखील पॉईंट्स असतात या जॅकेटची निर्मिती करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच होता. त्यामुळे छाती आणि पोटावर असे पॉईंट्स अपेक्षित होते. ज्याद्वारे निघणारा ईसीजी हा नेहमीच्या ईसीजी सारखाच असावा. जवळपास 1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर असे पॉईंट्स शोधण्यात आले. 2020 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डीओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॉजी कॉन्फरन्स मध्ये मांडण्यात आले. यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे पॉईंट्स नेहमीच्या ईसीजी पॉईंट्स सारखेचं असल्याचे सिद्ध केले. ही ह्या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती' अशी माहिती डॉ. गुरुनाथ परळे यांनी दिली. 

खेडेगावांपर्यंत उपकरण पोहोचवायचे आहे

'माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय अनुभवानुसार अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर केवळ ईसीजी वेळेत झाला नाही किंवा ईसीजी व्यवस्थित इंटरप्रिएट करता आला नाही, त्यामुळे जीव गमवावा लागलाय. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे मला असे वाटले की रुग्णांना जर घरी ईसीजी करता आला तर मदत होऊ शकते या संकल्पनेतून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषता खेडेगावांपर्यंत हे उपकरण पोहोचवायचे आहे. साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत हे जॅकेट रुग्णांना उपलब्ध होईल असे आम्हाला अपेक्षित आहे.' अशी प्रतिक्रिया डॉ. गुरुनाथ परळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Embed widget