एक्स्प्लोर

World Sight Day 2022 : ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने दृष्टीशी संबंधित आजार होऊ शकतात का? जाणून घ्या..

World Sight Day 2022 : भारत हा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, देशात रेटिनाशी निगडित आजार असलेल्या लोकांची संख्या तब्बल 1 कोटीहून अधिक आहे.

World Sight Day 2022 : दर वर्षी 13 ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टीदीन (World Sight Day 2022) साजरा होतो. डोळ्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवणे, डोळ्यांचे आरोग्य जपण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे या दिवसाचे लक्ष्य आहे. भारत हा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, देशात रेटिनाशी निगडित आजार असलेल्या लोकांची संख्या तब्बल 1 कोटीहून अधिक आहे. रेटिना अर्थात नेत्रपटलाचे आरोग्य जपण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑप्थॅल्मोलॉजिस्टकडून आपल्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेणे. यामुळे आजारांना प्रतिबंध करता येतो किंवा आजार असेलच, तर त्याचे वेळीच निदान होऊन वेळच्या वेळी मिळालेल्या योग्य उपचारांच्या मदतीने तो आटोक्यात ठेवता येतो.

याबाबत माहिती देताना व्हिट्रिओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्हणाले की, ‘माझ्या निरीक्षणानुसार वयाच्या साठीमध्ये असलेल्या किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींपैकी 60% व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मोतिबिंदूची समस्या जाणवते, ही वयोमानानुसार उद्भवणारी स्थिती आहे व त्यामुळे हळूहळू नजर कमी होत जाते. या रुग्णांपैकी 40% रुग्णांच्या बाबतीत या आजाराचे स्वरूप अधिक तीव्र असते व त्यांतून अंधत्व येऊ शकते. पण मोतिबिंदूचे रुग्ण हा आजार अगदी पुढच्या टप्प्यावर पोहोचल्यावर आले, तरीही शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र, ग्लुकोमा आणि रेटिनाशी निगडित आजारांवर उपचार केले गेले नाहीत, तर त्यातून होणारे परिणाम हे अपरिवर्तनीय असतात, ज्यामुळे अंधत्वही येऊ शकते. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. ग्लुकोमा आणि इतर नेत्रविकारांवरील उपचारांसाठी शस्त्रक्रियेसारख्या पर्यायांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.’

अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे उद्भवणाच्या डोळ्यांच्या समस्या

डोळे शुष्क होणे: तासनतास स्क्रीनकडे पाहत राहिल्यास आपल्या पापण्यांची हवी तितकी उघडझाप होत नाही. यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणारा अश्रूंचा पडदा उघडा पडतो आणि त्यामुळे डोळे कोरडे होतात व डोळ्यांना खाज येते.

डोळ्यांना थकवा येणे : अॅस्थेनोपिया, ऑक्युलर फटीग किंवा आय फटीग म्हणजे अतिवापरामुळे डोळ्यांना थकवा येणे. दीर्घकाळासाठी कम्प्युटर स्क्रीनकडे किंवा स्मार्टफोनकडे पाहत राहिल्यामुळे सर्रास जाणवणारा हा त्रास आहे. डोळ्यांना विश्रांती दिल्यास तो दूर होऊ शकतो.

एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी): एएमडीचा केंद्रीय दृष्टीवर परिणाम होतो आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या सर्रास आढळून येते. स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा खूप जास्त संपर्क आल्याने रेटिनाला दुखापत होते व त्यातून एएमडी उद्भवू शकतो. यामुळे कालांतराने अंधत्व येते. मात्रएएमडीचे निदान वेळीच झाल्यास तुम्हाला या आजारावर परिणामकारक उपचार मिळू शकतात.

दृष्टी धूसर होणे: मायोपिया किंवा नियर साइटेडनेस ही एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्यात दूरवरच्या गोष्टी नीट दिसत नाहीत, किंवा धूसर दिसतात, तर जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सतत घरातच राहणे आणि स्क्रीनकडे प्रदीर्घ काळासाठी बघत राहणे यामुळे तुमची नजर हातभर अंतराहूनही जवळ असलेल्या वस्तूवरच खिळून राहते, त्यामुळे नियर सायटेडनेस ही समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.

काय उपाय कराल?

डोळ्यांची शुष्कता, लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे आणि डोळ्यांशी निगडित इतर समस्या या खूप वेळ स्क्रीनकडे पाहत राहिल्याने जडतात. डोळ्यांच्या स्नायूंना अतिरिक्त ताण दिल्याची ती परिणिती असते. आपल्या डोळ्यांचे निरोगीपण जपण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे:

  • पापण्यांची उघडझाप करत राहिल्यास व हायड्रेटिंग आय ड्रॉप्सचा वापर केल्याने डोळ्यांच्या शुष्कतेची समस्या दूर होऊ शकते.
  • खोलीतील प्रकाशयोजनेत योग्य ते बदल करा व कॉम्प्युटरची स्क्रीन स्वत:पासून हातभर लांब असेल, याची काळजी घ्या.
  • स्क्रीनवरील मजकुराचा आकार मोठा करा म्हणजे डोळ्यांवर ताण येणार नाही आणि दर 30-40 मिनिटांनी विश्रांती घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

हेही वाचा :

World Sight Day : 'डोळ्यांवर प्रेम करा'; आज साजरा केला जातोय जागतिक दृष्टी दिन, जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget