(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Eye Donation Day 2023 : आज 'जागतिक दृष्टिदान दिन', वाचा या दिनाचं महत्त्व आणि 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी
World Eye Donation Day 2023 : सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
World Eye Donation Day 2023 : नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिन 'जागतिक दृष्टिदान दिन' ( World Eye Donation Day 2023) म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिन ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक दृष्टीदान दिनाचं महत्त्व नेमकं काय?
जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
1. निरोगी आहाराचे सेवन करावं : आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.
2. धूम्रपान सोडावं : धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात.
3. सनग्लासेस वापरा : सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरणे. हे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
4. टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
5. कमी प्रकाशात वाचू नका : डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
6. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.
7. खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देऊ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
8. उन्हात बाहेर जात असताना सनग्लासेस घाला. सनग्लासेस धोकादायक अल्ट्रा व्हायलेट 'ए' आणि अल्ट्रा व्हायलेट 'बी' किरणांना रोखतात.
9. जर तुम्ही पॉवर लेन्स वापरत असाल तर नक्कीच सनग्लासेस घाला ज्यामुळे UV किरणांचा डोळ्यांना त्रास होणार नाही.
10. दररोज किमान दोन लिटर पाणी प्यावे ज्यामुळे डोळे आणि त्वचेचा डिहायड्रेट होत नाही.
11. प्रत्येक अर्ध्या तासाने डोळ्यांना 5-10 मिनिटे विश्रांती देण्यास विसरू नका.
या गोष्टींची जर तुम्ही नीट काळजी घेतली तर तुम्हाला डोळ्यांच्या समस्या उद्भवणार नाहीत. तसेच, तुमचे डोळे निरोगी राहतील.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )