एक्स्प्लोर

Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

Important Days in June 2023 : जून महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत.

Important Days in June 2023 : अवघ्या दोन दिवसांवर जून महिना येऊन ठेपला आहे. जून महिन्यात वटपौर्णिमा, शिवराज्याभिषेकोत्सव दिन, आषाढी एकादशी यांसारखे महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. पण, त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घेऊयात.  

1 जून : छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद आणि अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. 

1 जून : आर. माधवन अभिनेता 

बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचं मूळ नाव माधवन रंगनाथन असं आहे. त्याचा जन्म झारखंडमध्ये झाला. आर. माधवने आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांतून केली.  तमिळ चित्रपटांशिवाय त्याने काही कन्नड, हिंदी, तेलुगू, इंग्लिश आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या आहेत. थ्री इडियट्समध्ये माधवनने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच, 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाने त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. 

2 जून : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा जन्मदिन

सोनाक्षी सिन्हा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. 2010 सालच्या 'दबंग' ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दबंगमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याच बरोबर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

3 जून : वटपौर्णिमा 

हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. 

4 जून : कबीर जयंती 

महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. कबीर हे मार्मिक कवी असण्याबरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल.

4 जून : अशोक सराफ यांचा जन्मदिन 

अभिनयसम्राट अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायक तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने आणि रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती.

5 जून : जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)

जागतिक पर्यावरण दिन हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.   

6 जून : शिवराज्याभिषेकोत्सव दिन 

छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला. या अनुषंगाने दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनला सुरु होतो. आणि शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा दिवस चालतो तो 12 जूनला तो पूर्ण झाला.  

7 जून : संकष्ट चतुर्थी 

7 जून 2022 रोजी ज्येष्ठ वद्य चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थी दिनी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. गणेश भक्तांसाठी संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असते. या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. त्यानंतर वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेशभक्त उपवास सोडतात.

7 जून : जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day) 

7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हे संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जनजागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणारा मृत्युदर कमी करणे हे या दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. 

8 जून : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश वाहन : हत्ती 

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात. यावेळेस वाहन हत्ती आहे. 

10 जून : जागतिक दृष्टिदान दिन 

नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.  सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

10 जून : पालखी सोहळा 

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे.

12 जून : बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day) 

जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे हा बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. 

14 जून : योगिनी एकादशी 

ऐहिक पारलौकिक फळ देत असताना इहलोकातील सर्व भोग प्राप्त करून देणारी आणि मुक्ती प्राप्त करून देणारी तिथी म्हणजे योगिनी एकादशी, असे या दिवसाचे वर्णन केले जाते. सत्ता संपत्ती यामध्ये सत्ता आल्यावर संपत्ती येते किंवा संपत्ती आल्यावर सत्ता देखील येऊ शकते. मात्र सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही मिळाल्यावरही समाधान मिळत नाही. यासाठीच वारकरी सांप्रदायात एकादशीचे व्रत हे समाधान प्राप्तीसाठी सांगितले आहे.

14 जून : जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना (WHO) 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो. 

15 जून : जागतिक पवन दिवस (Global wind day)

पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिन पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिन असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.

17 जून : गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी 

गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतिकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.

18 जून : झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)

राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

19 जून : महाकवी कालिदास दिन 

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 जून रोजी साजरा केला जाणर आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो. त्यामुळे हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते. 'उपमा' या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत.

18 जून : जागतिक पितृदिन (World Father’s Day) 

'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन वडिलांप्रती प्रेम व्यक्त केलं जातं. 

21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) 

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार 21 जूनला हा दिवस साजरा केला जातो. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

22 जून : विनायक चतुर्थी 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीचा उपवास गुरुवार, 22 जून रोजी आहे. या दिवशी बाधा श्री गणेशाची विधिवत पूजा करतात. विशेष म्हणजे ही पूजा दुपारपर्यंत पूर्ण होते. कारण या व्रतामध्ये चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. 

25 जून : सई ताम्हणकरचा जन्मदिन

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखली जाते. सई मूळची सांगलीची आहे. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 2013 साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.

25 जून : अभिनेत्री करिश्मा कपूरचा जन्मदिन

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. 1991 साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. 1990 च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. 1996), दिल तो पागल है (इ.स. 1997), फिजा (इ.स. 2000), झुबैदा (इ.स. 2001) हे चित्रपट विशेष गाजले.

26 जून : छत्रपती शाहू महाराज जयंती 

शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य महान आहे.  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. 

29 जून : देवशयनी आषाढी एकादशी 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे याला देवपद एकादशी, देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीपासून देवोत्थान एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागावर विसावतात. या चार महिन्यांत सर्व शुभ कार्यांवर बंदी असते. या दरम्यान मुंडन, उपनयन संस्कार, विवाह इत्यादी महत्वाची शुभ कार्ये थांबवली जातात. 

29 जून : बकरी ईद 

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी 29 जून 2023 रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. बकरी ईद हा सण मुस्लिम धर्मातील लोक मिठी ईदच्या 70 दिवसांनी म्हणजेच ईद उल फित्र नंतर साजरा करतात. या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. गरीब लोकांना जेवण दिलं जातं. या कुर्बानीची तीन हिस्स्यांमध्ये विभागणी केली जाते. एक हिस्सा गरीबांना, दुसरा हिस्सा मित्रांना, नातेवाईकांना आणि तिसरा हिस्सा हा स्वत:कडे ठेवला जातो. 

29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस (National Statistics Day)

राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी 29 जून रोजी भारतात साजरा केला जातो. देशाचे महान सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरी केली जाते. आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल देशाच्या विधान परिषदेने प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरी करण्याचा ठराव मंजूर केला. भारत सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या :

Important Days in May 2023 : 'महाराष्ट्र दिन', 'बुद्धपौर्णिमा'सह विविध सणांची मांदियाळी, मे महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget