एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Heart Disease : महिलांनाही हृदयविकाराचा धोका, काय असतात लक्षणं?; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी

Women Heart Disease : महिलांनाही हृदयविकाराचा धोका असतो, महिलांमध्ये अनेक वेळा हृदयविकाराचे लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते.

Women Heart Disease : हृदयविकार (Heart Disease) म्हणजेच हृदयाशी संबंधित आजारांचा विचार केला की, सामान्यतः पुरुषांनाच याचा जास्त धोका आहे असे मानले जाते. परंतु सत्य हे आहे की, महिलांनाही (Womens) हृदयविकाराचा धोका तितकाच गंभीर आहे, किंबहुना अनेक वेळा महिलांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. याबाबतची माहिती एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे (Dr. Abhijit Borse) यांनी दिली आहे. जाणून घेऊयात... 

महिलांमध्ये हृदयविकाराच्या लक्षणांचे वेगळेपण

पुरुषांप्रमाणे महिलांमध्येही हृदयविकाराची लक्षणे असतात, परंतु ती काही वेळा वेगळी किंवा सौम्य स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ, छातीत तीव्र वेदना ही पुरुषांमध्ये हृदयविकाराचा प्रमुख लक्षण असते, तर महिलांमध्ये गळा, पाठ, खांदा, जबडा किंवा पोटात दुखणे, दम लागणे, थकवा, घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता ओळखण्यासाठी महिलांनी ही लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत.

स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक  

ताणतणाव आणि चिंता : महिलांमध्ये ताणतणाव आणि मानसिक दडपण अधिक प्रमाणात आढळते. हे हृदयविकाराच्या जोखमीला चालना देऊ शकते.

हार्मोनल बदल : रजोनिवृत्तीच्या आधी आणि नंतर होणारे हार्मोनल बदल हृदयविकाराचा धोका वाढवतात. इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्याने हृदयाचे रक्षण करणारे घटक कमी होतात.

लठ्ठपणा आणि डायबिटीज : महिलांमध्ये वाढलेले वजन, विशेषतः पोटाच्या भागातील चरबी, हृदयविकाराचा धोका वाढवते. तसेच मधुमेह असलेल्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका पुरुषांपेक्षा अधिक असतो.

उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल : उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हृदयविकारासाठी प्रमुख घटक आहेत. परंतु महिलांमध्ये हे जोखमीचे घटक योग्य वेळी ओळखले जात नाहीत, ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते.

महिलांनी घेतली पाहिजे अशी काळजी  

नियमित तपासणी : महिलांनी नियमितपणे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, आणि रक्तातील साखरेची तपासणी करून हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

व्यायाम आणि आहार : संतुलित आहार, ताज्या फळा-भाज्या, आणि पूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा. दररोज ३० मिनिटं चालणे किंवा इतर प्रकारचा व्यायाम हा हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा: तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्यामुळे त्याचे सेवन पूर्णपणे टाळावे.

मानसिक ताण कमी करा : योगा, ध्यान आणि इतर तणाव कमी करणाऱ्या क्रियांचा अवलंब करावा. मानसिक तणाव हृदयाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

आरोग्य शिक्षण : महिलांनी हृदयविकाराच्या जोखमीबद्दल शिक्षण घेतले पाहिजे आणि हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे.

महिलांच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?  

आजही महिलांमध्ये हृदयविकाराबद्दल जागरूकता कमी आहे. त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते आणि त्यांच्यावर त्वरित उपचार होत नाहीत. हृदयविकार हा जगभरातील महिलांमध्ये मृत्यूचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करणे, जागरूकता वाढवणे, आणि महिलांना त्यांची आरोग्य काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली, आहार आणि नियमित तपासणी यांचं महत्त्व ओळखून त्यानुसार पावलं उचलणे गरजेचं आहे. महिलांच्या हृदयविकाराबद्दलची ही शांतता मोडायला हवी, कारण आरोग्याचं रक्षण हेच खरं सामर्थ्य आहे, असे डॉ. अभिजित बोरसे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Health: नवरात्रीचं निमित्त उत्तम, शरीर करा डिटॉक्स! विषारी पदार्थ टाका काढून, 'या' पद्धतींचा अवलंब करा

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget