Health: नवरात्रीचं निमित्त उत्तम, शरीर करा डिटॉक्स! विषारी पदार्थ टाका काढून, 'या' पद्धतींचा अवलंब करा
Health : नवरात्रीच्या मुहूर्तावर उपवास करताना काही पद्धतींचा अवलंब करून शरीर विषमुक्त करता येते. कसं ते जाणून घ्या...
Health : शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri 2024) सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी देवीचं आगमन अगदी जल्लोषात झालंय. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक केवळ पूजाच करत नाहीत तर उपवासही करतात. या काळात तुम्ही कशाप्रकारे उपवास करू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु काही पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता.
डॉक्टरांचा सल्ला घ्याच... पण...
नवरात्रीचं निमित्त साधून शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच तुम्हाला कोणताही गंभीर आजार असल्यास असे काही करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील. जेव्हा तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकू इच्छित असाल, तेव्हा हे काही उपाय आहेत.
उपवास स्वतःच डिटॉक्सिफाय करतो -
कोणता उपवास ठेवायचा यापेक्षा उपवास ठेवणं महत्त्वाचं आहे. हे स्वतःच डिटॉक्सिफिकेशनसाठी पुरेसे आहे. मात्र, या काळात अन्नापासून दूर राहण्याची काही अटी येथे लागू करण्यात आली आहे. या काळात उपवासासाठी खास तयार केलेले तळलेले अन्न खाऊ नये. शरीरातून विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन बाहेर पडावे, म्हणून असे काहीही खाऊ नका हेच उत्तम.
मोनो डाएट
मोनो डाएटमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, विशेषतः वजन कमी होते. यासाठी तुम्हाला एक फळ किंवा भाजी निवडावी लागेल आणि तेच काही दिवस खावे लागेल. जर अवघड वाटत असेल तर एका दिवसापासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, तुम्ही सफरचंद निवडल्यास, दिवसभरात जितक्या वेळा भूक लागेल तितक्या वेळा फक्त सफरचंद खा. त्याचप्रमाणे तुम्ही गाजर किंवा पेरू किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही फळ निवडू शकता.
वॉटर फास्टींग
जर तुम्ही फक्त पाणी पिऊन उपवास करू शकत असाल तर ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात आश्चर्यकारक काम करते. तुम्ही पाण्यात लिंबू, पुदिना, काकडी यांसारख्या गोष्टी टाकून डिटॉक्स वॉटर बनवू शकता आणि दिवसभर पिऊ शकता. मात्र, हे लक्षात ठेवा की डिटॉक्स वॉटर तयार करा आणि ते एक दिवस अगोदर ठेवा.
नारळ पाणी फास्टींग
जर तुम्हाला नारळाचे पाणी आवडत असेल तर तुम्ही हे देखील निवडू शकता. यासाठी तुम्हाला दिवसभर फक्त नारळ पाणी प्यावे लागेल. तुम्ही दिवसातून चार ते पाच ग्लास नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला आराम मिळेल आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतील. यातूनही तुमचं समाधान होत नसेल, तर तुम्ही मोसंबी किंवा संत्रा यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचा रस देखील घेऊ शकता.
एक गोष्ट लक्षात ठेवा...
एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या क्षमतेनुसार आणि शारीरिक स्थितीनुसार निवडा. नवरात्रीच्या निमित्ताने डिटॉक्सचा सल्ला दिला जातो, कारण एखादी व्यक्ती उपवासाच्या काळात ती पूर्ण करते. सामान्य दिवसांमध्ये प्रेरणा तितकी जास्त नसते.
हेही वाचा>>>
Health: भारतात 50 वर्षांखालील पुरुषांना धोका, प्रायव्हेट पार्ट्सला होणाऱ्या 'या' कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, 'ही' लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )