(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
Health Tips : आम्ही तुम्हाला हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
Health Tips : भुईमुगाला (Peanut) प्रथिने आणि फायबरचे भांडार म्हणतात. हिवाळ्यात (Winter) शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ले जाते. शेंगदाण्यात मॅंगनीज (Manganese) आणि कॅल्शियम (Calcium) दोन्ही आढळतात. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्याने एका घटकामुळे शरीराला दोन प्रकारचे फायदे होतात. मॅंगनीज हाडांमध्ये कॅल्शियम (Calcium) शोषण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे
हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर थंडीचा प्रभाव पडत नाही. यामुळे तुम्ही सर्दी (Cold) आणि फ्लूच्या (Flu) कचाट्यात पडत नाही. तसेच, शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर
शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. यामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हृदयाशी (Heart Disease) संबंधित आजारांपासूनही सुटका मिळते.
पचनासाठी फायदेशीर
शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते. तर, जेवणानंतर दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास ते अन्न पचण्यास मदत करते. शेंगदाणे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Winter Skin Care : हिवाळ्यात तजेलदार त्वचा हवीय? करा 'या' नैसर्गिक तेलांचा वापर
- Kim Jong Un : किंम जोंग उनने गाठला निर्घृणतेचा कळस; दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंड
- Trending : तीन वर्षांपूवी झाडासोबत लग्न, आडनावही बदललं, आता नवा बॉयफ्रेंड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )