Malaria Vaccine : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! मलेरियावरील भारतीय लसीचा WHO च्या यादीत समावेश
India Malaria Vaccine In WHO : 30 वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या मलेरियावरील भारतीय लसीला WHO च्या यादीत सामील करण्यात आलं आहे.
Malaria Vaccine R21/Matrix-M : भारताच्या (India) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मलेरिया (Malaria) रोगावरील भारतीय लसीला (Indian Vaccine) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) यादीत सामील करण्यात आलं आहे. मलेरिया आजाराने भारताप्रमाणे अनेक देशांमध्ये कहर माजवला आहे. आता मलेरिया आजारावरील एका भारतील लसीला जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाच्या यादीत सामील केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सीरम इन्स्टिट्युटने ही लस तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्युटच्या R21/Matrix-M या मलेरिया वॅक्सिनने जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध 75 चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यानंतर डब्ल्यूएचओने या लसीचा यादीत समावेश केला आहे.
मलेरियावरील भारतीय लस WHO च्या यादीत
मलेरियावरील या भारतीय लसीचं नाव R21/Matrix-M असं आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी मिळून तयार केली आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मंजुरी दिली होती. आता जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला लसीकरण यादीत सामील केलं आहे. भारताने 30 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर मलेरियावरील ही लस विकसित केली आहे.
मलेरियावर स्वस्त आणि प्रभावी उपाय
R21/Matrix-M ही WHO च्या मलेरिया प्रीक्वालिफाइड यादीत सामील होणारी दुसरी आणि पहिली भारतीय लस आहे. याआधी गेल्या वर्षी एका लसीचा या यादीत समावेश करण्यात आला होता. पण, त्यानंतर भारताने R21/Matrix-M ची निर्मिती करत जगाला मलेरियावरील स्वस्त आणि प्रभावी उपाय उपलब्ध करुन दिला आहे.
WHO च्या यादीतील मलेरियावरील दुसरी लस
जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर 2023 मलेरिया रोगावरील R21/Matrix-M या दुसऱ्या लसीला मंजुरी दिली होती. ही नवी लस मलेरिया रोगाशी लढण्यास मदत करेल, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं. मलेरियाची R21/Matrix-M ही नवी लस स्वस्त आणि अधिक प्रभावी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं यावेळी सांगितलं होतं की, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने दोन तज्ज्ञ गटांच्या सल्ल्यानुसार R21/Matrix-M या लसीला मान्यता देण्यात आली आहे. मलेरिया संशोधक म्हणून मी त्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा आपल्याकडे मलेरियाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस असेल. आता आपल्याकडे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी दोन लसी आहेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )