सनबर्न का होतं आणि त्यावर उपाय काय? असे झाल्यास नेमकी काय काळजी घ्यावी?
How to Treat Sunburn : सनबर्न का होतं आणि त्यावर उपाय काय? असे झाल्यास नेमकी काय काळजी घ्यावी? हे सविस्तर वाचा.
मुंबई : सनबर्न म्हणजे त्वचेवर येणारी जळजळ, जी सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे होते. सनबर्न झाल्यावर त्वचा लाल होते, जळजळ होते आणि कधी कधी पाण्याने भरलेले फोड येतात.
सनबर्न का होते? त्यामागची कारणे काय?
UV-A आणि UV-B किरणे
सूर्यप्रकाशातील UV-A आणि UV-B किरणे त्वचेमध्ये प्रवेश करतात आणि त्यातील पेशींना हानी पोहोचवतात.
जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणे
सुरक्षात्मक उपाय न करता जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते. मो
तापमान आणि उंची
उच्च तापमान आणि उंचीवरील ठिकाणी सूर्यप्रकाश अधिक तीव्र असतो.
सनबर्नवरील उपाय
- सनस्क्रीन : घराबाहेर जाताना SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन वापरा.
- कपडे : पूर्ण शरीर झाकलं जाईल असे सुती कपडे आणि टोपी वापरा.
- सनग्लासेस : UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा.
सनबर्न झाल्यावरची काय काळजी घ्यावी?
थंड पाण्याचा शॉवर
थंड पाण्याचा शॉवर घ्या किंवा ओल्या कपड्याने हलक्या हाताने पुसा.
मॉइस्चरायजर
अलोवेरा किंवा कोकोआ बटर असलेले मॉइस्चरायजर लावा.
द्रव पदार्थाचं सेवन करा
भरपूर पाणी प्या, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील.
औषधे
वेदना आणि सूज कमी करण्यासाठी इबूप्रोफेन किंवा पॅरासिटामोल घेऊ शकता, पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फोडांची काळजी
सनबर्नमुले फोड आले असल्यास ते फोडू नका, ते आपोआप बरे होऊ द्या.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
सनबर्न खूप गंभीर असल्यास किंवा फोड बरे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सूर्यप्रकाशाच्या किरणांपासून संरक्षण घेतल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास सनबर्न टाळता येऊ शकते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )