(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bad Health Habits : 'या' वाईट सवयी आजाराला आमंत्रण, आजच बदला, नाहीतर होईल नुकसान
Health Tips : सध्याच्या व्यस्त आणि आधुनिक लाईफस्टाईलमध्ये अनेक वाईट सवयी लागतात. याचा कळत- नकळत तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
Health Tips : सध्याच्या व्यस्त आणि आधुनिक लाईफस्टाईलमध्ये अनेक वाईट सवयी (Bad Habits) लागतात. याचा कळत- नकळत तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. या वाईट सवयींमुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या वाईट सुवयी तुम्ही वेळीच सोडायला हव्यात. या वाईट सवयी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल वाचा सविस्तर.
तासनतास टिव्ही किंवा मोबाईल पाहणे
जर तुम्हालाही तासनतास टिव्ही किंवा मोबाईल पाहण्याची सवय आहे, तर ही वाईट सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. टिव्ही किंवा मोबाईल पाहताना तुम्ही बराच वेळ एकाच जागी बसता, यामुळे शरीराची जास्त हालचाल होत नाही. परिणामी शरीराचा व्यायाम होत नाही, हेच आजारांसाठी आमंत्रण ठरते.
जास्त खाणं
अनेक वेळा लोक गरजेपेक्षा म्हणजे भूक असेल त्यापेक्षा जास्त अन्नपदार्थ खातात. मात्र ही फार वाईट सवय आहे. जास्त खाण्याच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
धूम्रपान किंवा मद्यपान करणे
वाईट सवयींपैकी धूम्रपान किंवा मद्यपान करणे या सवयीने शरीराला जास्त नुकसान होते. धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने तुम्हाला अनेक आजारांचो धोका संभवतो. यामध्ये फुफ्फुसासंदर्भातील आजार, दमा किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
नाकातील केस कापणे
अनेक जण सुंदर दिसण्यासाठी नाकातील केस कापतात. पण याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. नाकातील केस हे तुमच्या श्वसन प्रक्रियेत मदत करतात. नाकाच्या आतील केस श्वसनावेळी धूळ, जंतू आणि घाण यांना श्वासावाटे शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात. पण जर तुम्ही नाकातील केस कापले तर तुमच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन तुम्ही आजारी पडू शकता.
टूथब्रश साफ न करणे
टूथब्रश साफ न करण्याची सवय सोडा. ब्रश करण्याआधी आणि नंतर टूथब्रश साफ न करणे फार गरजेचं आहे. दात घासताना टूथब्रशसोबत बॅक्टीरिया तुमच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. यामुळे तोंडासंबंधित आजारही होऊ शकतात. यामुळे टूथब्रश साफ करण्याची सवय करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )