(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? 'या' रेसिपी ट्राय करा
5 weight loss Recipe : वजन वाढवणे खूप सोपं आहे, पण ते कमी करणे फार कठीण. सध्या बहुतेकांना वाढत्या वजनाची समस्येने त्रस्त आहेत.
5 Weight Loss Recipe : वजन वाढवणे खूप सोपं आहे, पण वजन कमी करणे फार कठीण. सध्या बहुतेकांना वाढत्या वजनाची समस्येने त्रस्त आहेत. व्यस्त जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाची कमतरता यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आजारांना आमंत्रण मिळतं. यामुळे इतरही अनेक समस्या उद्भवतात. तुम्हालाही वजन कमी करायचं आहे. पण डाएटिंगसाठी अधिक वेळ मिळत नसेल. तर काही झटपट बनणाऱ्या कमी कॅलरीच्या रेसिपीद्वारे तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.
अक्रोड अंजीर स्मूदी
बहुतेकांना असं वाटत की केळी खाल्याने वजन वाढते. पण जर तुम्ही केळी, अक्रोड आणि अंजीरमध्ये दूध मिसळून स्मूदी प्यायली तर तुमचे वजन लवकर कमी होईल.
दही चणा चाट
प्रथिनेयुक्त उकडलेले चणे आणि दही बनवलेली चाट तुमचं वजन कमी करण्यासाठी उत्तम रेसिपी आहे. या रेसिपीसाठी फक्त काही उकडलेले चणे आणि दही मिसळून यामध्ये तुमचा आवडता मसाला किंवा चाट मसाला मिसळा आणि याचा आनंद घ्या.
ओट्स दही मसाला
वजन कमी करण्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ओट्समध्ये दही मिसळल्याने ते खूप चविष्ट होतात. त्यासाठी तुम्ही ओट्स दह्यामध्ये भिजवा आणि तुमच्या आवडत्या चिरलेल्या भाज्यांसोबत जसे की गाजर, कांदा कोथिंबिर या सोबत मिक्स करा. यात मीठ, भाजलेले जिरे पावडर आणि लाल तिखट घालून तुमचा ओट्स-दही मसाला तयार आहे.
हिरवे सफरचंद पालक स्मूदी
सफरचंदमध्ये फायबर असते जे खाल्ल्यानंतर हळूहळू पचते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. तुम्ही सफरचंद आणि पालक मिसळून हिरव्या सफरचंदाची स्मूदी बनवू शकता हे तुमचं वजन कमी करण्यास मदत करेल.
केळी, दालचिनी, बदाम स्मूदी
एक केळी, चार बदाम, दूध, दही आणि दालचिनी पावडर मिक्स करून तुम्ही स्मूदी अगदी सहज तयार करू शकता. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून स्मूदी बनवा. ही स्मूदी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.
डाळ
डाळ खूप फायदेशीर असते कारण त्यात प्रोटीन असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण अनेकवेळा आपण घरी बनवलेल्या डाळीला तेल किंवा तूपाची फोडणी देतो, यामुळे वजन वाढते. तुम्ही तूप किंवा तेलाची फोडणी न घालता डाळीचं सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Weight Loss Tips : व्यायाम न करता वजन कमी करायचंय, 'या' टिप्स वापरून मिळवा परफेक्ट फिगर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )