एक्स्प्लोर

Vitiligo Leukoderma : त्वचेवर दिसणारे पांढरे डाग कसे तयार होतात? असू शकतो Vitiligo आजार; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं

Vitiligo Leukoderma Symptoms : त्वचेचा रंग निखळायला लागला असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका. त्यापेक्षा ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Vitiligo Leukoderma Symptoms : मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजार होत असतात. यामधलाच एक आजार म्हणजेच शरीरावर पांढरे डाग दिसणे. यालाच व्हिटिलिगो ल्युकोडेर्मा (Vitiligo Leukoderma) असेही म्हणतात. या पांढऱ्या डागांच्या संदर्भात आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की, शरीरात हा पांढरा डाग कसा होतो? हा आजार अचानक कसा झाला? या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती? पांढरे डाग पडल्यानंतर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? मला पांढरे डाग पडल्यास मी काय करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पडली असतील. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.   

पांढर्‍या डागांबाबत लोकांच्या मनात अजूनही एक विचित्र भीती आहे. एवढेच नाही तर, अनेकजण या आजाराला कुष्ठरोग, पूर्वजन्माचे पाप आणि इतर अनेक नावांनी संबोधतात. पण हा आजार यापैकी कोणत्याही कारणांमुळे नसून तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होतो. तसेच, चुकीच्या खाण्यापिण्यामुळेही हा आजार वाढतो असे अनेकांचे म्हणणे आहे.   

डॉक्टरांच्या मते, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात 'मेलेनोसाइट्स' (Melanocytes) म्हणजेच त्वचेचा रंग बनवणाऱ्या पेशी नष्ट होतात. तेव्हा त्याला 'ल्युकोडर्मा' (Lyukoderma) किंवा 'व्हिटिलिगो' (Vitiligo) रोग होतो. हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. त्वचा तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे. त्यांनाही हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. वैद्यकशास्त्रानुसार उपचार करून हा आजार बरा होऊ शकत नाही. 

पांढऱ्या डागांची सुरुवातीची लक्षणं (Vitiligo Leukoderma Symptoms) : 

  • पांढऱ्या डागांच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे त्वचेवर ठिकठिकाणी पांढरे डाग दिसणे.
  • सर्वप्रथम याची सुरुवात हात, पाय, चेहरा, ओठ यांपासून सुरु होते. 
  • केस कोरडे होणे, दाढी आणि भुवया पांढरे होणे.
  • डोळ्यांच्या रेटिनल लेयरचा रंग मंदावणे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Maiden Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Embed widget