Maiden Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण
Maiden Pharma Cough Syrup Row : भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या औषधांवर बंदी आणण्यात आली आहे.
![Maiden Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण use of solvent with expiry date in making cough syrups many more flaws found reasons behind ban on maiden pharmaceuticals Maiden Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/c2c0b16497f949c3087dabf26d299c101665734648890322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maiden Pharmaceuticals Ltd Cough Syrup : हरियाणातील (Haryana Govt) मेडेन फार्मास्युटिकल्स (Maiden Pharmaceuticals Ltd) या कंपनीच्या कफ सिरप (Cough Syrup) उत्पादनावर बंदी आणली आहे. या कफ सिरपमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. मेडेन फार्मास्युटिकल्स कंपनीकडून कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर केल्याचं आढळून आलं आहे. मेडेन कंपनीच्या कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणाची गंभीर दखल घेत मेडेन कंपनीच्या कफ सिरप उत्पादनावंर बंदी आणली. याशिवाय प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
मेडेन फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनावर बंदी
जागतिक आरोग्य संघटनेनेकडून (WHO) मेडेन फार्मास्युटिकल्स बाबत अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर भारत सरकारकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीपत येथील मेडेन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या चारही कफ सिरपची तपासणी करण्यात येत आहे. या कफ सिरपचे सँपल कोलकाता येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी मेडेन कंपनीला कारणे दाखवा नोटी बजावण्यात आली. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी मेडेन कंपनीच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली.
कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट जवळ असलेल्या पदार्थांचा वापर
आता या तपासणीचा अहवाल समोर आला असून या रिपोर्टमध्ये कफ सिरपमध्ये असलेल्या त्रुटींबाबतची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या मीडिया रिपोर्टनुसार, मेडेन फार्मास्टुटिकल्सकडून तयार करण्यात आलेले कफ सिरप तयार करण्यासाठी एक्सपायरी डेट जवळ असणाऱ्या सॉल्वेट पदार्थांचा वापर करण्यात आला होता. कफ सिरपमध्ये वापर करण्याआधी या सॉल्वेटची योग्य चाचणी करण्यात आली नव्हती. कफ सिरपच्या उत्पादनाची तारीख चुकीची दाखवण्यात आली. याशिवाय मुख्य परीक्षण अहवाल गायब होता.
कफ सिरपच्या उत्पादनात अनेक त्रुटी आढळल्या
मेडेन कंपनीने कफ सिरपची खेप तयार केली त्याची एक्सपायरी डेट नोव्हेंबर 2024 होती. मात्र त्यामध्ये वापरण्यात आलेल्या प्रोपीलीन ग्लायकोलची एक्सपायरी डेट सप्टेंबर 2023 होती. कंपनीने गुणवत्ता परिक्षणावेळी सॉल्व्हेंट्समध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची चाचणी केली नाही. चारही कफ सिरपच्या उत्पादनाची तारीख डिसेंबर 2021 दाखवण्यात आली पण त्यांचं उत्पादन 2022 मध्ये करण्यात आलं. फेब्रुवारी 2022 मध्ये या कफ सिरपच्या उत्पादनासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली होती.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)