Health News : योनीमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल?
Health News : सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा दिसून येतो. स्त्रियांना योनीमार्गाच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल माहित असणे आवश्यक आहे तसेच योनीमार्गाची काळजी कशी घ्यावी हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया
Health News : स्त्रियांना योनीमार्गाच्या (Vagina) आरोग्याच्या समस्यांबद्दल माहित असणे आवश्यक आहे तसेच योनीमार्गाची काळजी कशी घ्यावी हे या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा दिसून येतो. रजोनिवृत्तीदरम्यान (Menopause) इस्ट्रोजेन पातळीमुळे योनीमार्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. तणाव, चिंता, रक्त प्रवाह कमी होणे आणि निर्जलीकरण हे काही घटक आहेत ज्यामुळे योनीमार्गाचे वंगण कमी होऊ शकते. तसेच, योनीमार्गातील कोरडेपणा (Vaginal Dryness) टाळण्यासाठी आणि वंगण वाढवण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे.
योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे कोणत्या समस्या उद्भवतात?
योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे जळजळ होणे तसेच इतर लक्षणांमध्ये लैंगिक संबंधातील रस कमी होणे, वेदनादायक संभोग, योनीमार्गाला खाज सुटणे, मूत्रमार्गातील संक्रमण (यूटीआय) यांचा समावेश आहे.
योनीमार्गाच्या कोरडेपणाची कारणे
कमी इस्ट्रोजेन पातळी, धूम्रपान, रासायनिक उत्पादनांचा वापर, अतिप्रमाणातील शारीरिक क्रियाकलाप, शस्त्रक्रिया, विशिष्ट औषधे, तणाव आणि डचिंग यामुळे देखील कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.
योनीमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन कसे कराल?
वेळीच उपचार न केल्यास तसेच योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे योनीच्या ऊतींमध्ये फोड किंवा तेथील त्वचा फाटण्याचा धोका वाढतो.
योनीमार्गाच्या कोरडेपणावर अशाप्रकारे करा उपचार!
डॉक्टरांच्या सल्ल्याने जे ओव्हर-द-काऊंटर वंगण किंवा मॉइश्चरायझर्सचा वापर करण्यास सांगितला जाईल. त्यामुळे योनीच्या भागातील कोरडेपणा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला गोळी, क्रिम किंवा रिंगच्या स्वरुपातील इस्ट्रोजेन थेरपीची देखील शिफारस केली जाईल, जी इस्ट्रोजेन सोडण्यास मदत करते.
संतुलित आहाराचे सेवन करा
व्हिटॅमिन डी : सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ते योनीतील वंगण वाढवण्यात देखील मदत करु शकते. एवढेच नाही तर रजोनिवृत्ती दरम्यान योनीमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन आणि योनीचे आरोग्य सुधारण्यास ड जीवनसत्वयुक्त सप्लीमेंट मदत करु शकते.
व्हिटॅमिन ई : हे एक अँटिऑक्सिडंट आहे. संशोधनानुसार, वंगण आणि योनीमार्गाच्या कोरडेपणाचा सामना करण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचा आहारात समावेश करु शकता.
हायलुरोनक अॅसिड : ग्लुकोसामाइन सल्फेट, अल्फा-लिपोइक अॅसिड आणि ए, सी आणि ई जीवनसत्त्वे यांसारख्या इतर घटकांसह योनीमार्गाचा कोरडेपणा सुधारण्यास मदत होते. अगदी हायलुरोनक अॅसिडयुक्त जेल देखील व्हिटॅमिन ई सोबत योनीमार्गाचे स्नेहन (lubrication) वाढवत असल्याचे दिसून आले आहे.
फिश ऑईल : फिश ऑईलमधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड रजोनिवृत्ती दरम्यान योनीतील वंगण वाढवण्यास आणि योनीमार्गाचा कोरडेपणा टाळण्यास मदत करते.
- डॉ प्रीतिका शेट्टी, प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )