(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Summer Tips : उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा
Summer Tips : उष्णतेपासून स्वत:चा बचाव कसा करावा यासाठी काही खास टिप्स जाणून घ्या.
Summer Tips : उन्हाळा सुरु झाला आहे. त्यातच मे महिन्याचा उष्मा किती धोकादायक असतो हे आपणा सर्वांनाच माहित आहे. अशा परिस्थितीत उष्णतेपासून वाचण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात अशा गोष्टींचा आहारात समावेश करा जेणेकरून शरीर आतून थंड राहील. उष्णतेपासून स्वत:चा बचाव कसा करावा यासाठी काही खास टिप्स जाणून घ्या.
उष्णता कशी टाळायची ?
1. कैरीचं पन्हं - उन्हाळ्यात शरीराला उष्णतेपासून वाचविण्यासाठी कैरीचं पन्हं नक्की प्या. कैरीचं पन्हं प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटालाही थंडावा मिळतो. कैरीचं पन्हं दिवसातून किमान दोनदा प्यायल्याने तुम्हाला थंडावा मिळेल.
2. ताक - उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तसेच शरीराला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोनदा ताक पिणे आवश्यक आहे. ताक प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच अन्न पचण्सासंही ताकाचा खूप उपयोग होतो.
3. लस्सी - उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात लस्सीने करा. जर तुम्हाला सकाळी लस्सी पिण्याची सवय नसेल तर दुपारी जेवणानंतरही तुम्ही लस्सी पिऊ शकता. यामुळे शरीर थंड राहून उष्णतेपासून आराम मिळेल.
4. दही - दही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही खावे. यामुळे शरीराचे पचनही चांगले होते.
5. कोकम सरबत - विशेषतः उन्हाळ्यात तुम्ही कोकम सरबत नक्की प्यावे. कोकम सरबत पचायलाही चांगला असतो. आणि यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो.
6. कच्चा कांदा - उन्हाळ्यात कच्चा कांदा जरूर खावा. कच्चा कांदा उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवतो. कांदा जेवणासोबत सॅलड म्हणून खा. याशिवाय तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर डोक्यावर कच्च्या कांद्याचे तुकडे ठेवून त्यावर जर सुती कापडाने डोके झाकून घेतले तर उन्हापासूनही तुमचे संरक्षण होईल.
7. लिंबूपाणी - उन्हाळा आला की शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत तुम्ही रोज लिंबूपाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि लिंबातून व्हिटॅमिन सी मिळते. लिंबू पाणी पोटासाठी खूप फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Raw Onion Benefits: उन्हाळ्यात कांद्याचे सेवन आरोग्यदायी, जाणून घ्या 5 फायदे
- Summer Food : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा, वाचा सविस्तर
- Health Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )