Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट
अखेर वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा सीआयडीचा ठपका, आजच नव्याने कोठडी मागणार
वाल्मिक कराडला केज सत्र न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, मकोकाअंतर्गत पोलीस नव्याने मागणार कोठडी, बीड जेलमधून उद्या पुन्हा कोर्टात आणण्याची शक्यता
पोलीस ठाण्याबाहेर ठिय़्या देणाऱ्या कराडच्या आईंची तब्येत बिघडली, आंदोलनादरम्यान भोवळ, कराड समर्थकांचंही परळीत ठिकठिकाणी आंदोलन
संजय राऊत हा आमचा विषय कधी नव्हता आणि राहणारही नाही, काँग्रेसवर वारंवार निशाणा साधणाऱ्या राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पलटवार
पक्ष अडचणीत असताना ज्येष्ठ नेत्यांनी संयमाने वक्तव्यं करावीत, खासदार संजय राऊत यांचा भास्कर जाधवांना सल्ला, शिवसेनची काँग्रेस व्हायला लागली असल्याचं जाधवांनी केलं होतं वक्तव्य
उद्धव ठाकरेंना स्मारक समितीवरुन हटवण्याची भाषा ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, शिवसेनेच्या प्रस्तावावर संजय राऊत आक्रमक, शिंदे गटाला सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा आरोप
नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे तरुणाचा मृत्यू,
जीवघेण्या मांजाविरोधात राज्यभरात पोलिसांची धडक कारवाई, नाशकात २८ जण अटकेत तर नागपुरात दुचाकीस्वारांना सेफ्टी बॅण्डचं वितरण