एक्स्प्लोर

Mobile Phone Effect : सावधान! मोबाईल फोनच्या जास्त वापरामुळे वंधत्वाचा धोका? अभ्यासात धक्कादायक बाब समोर

Mobile Phone Excess Use : मोबाईल फोन वापरल्याने शुक्राणू कमी होऊ शकतात. गेल्या 50 वर्षांत वीर्य दर्जा घसरल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे.

Mobile Phone Effect On Sperm : सध्या मोबाईल फोन (Smartphone) हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. मोबाईल फोन जितका उपयोगी आहे, त्याचा अतिवापर केल्यास तो आरोग्यासाठी तितकाच घातक ठरु शकतो. एका अभ्यासानुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (Electromagnetic Radiation) उत्सर्जित करणार्‍या मोबाईल फोनच्या (Mobile Phone) वारंवार वापरामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. 

मोबाईल फोनच्या जास्त वापरामुळे शुक्राणूवर परिणाम

स्वित्झर्लंडमधील (Switzerland) जिनिव्हा विद्यापीठातील (University of Geneva) एका टीमने 2005 ते 2018 काळात 18 ते 22 वयोगटातील 2,886 स्विस पुरुषांच्या डेटावर आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला. मोबाइल फोनचा वारंवार वापर आणि शुक्राणूंची कमी गुणवत्ता यांच्यात संबंध असल्याचं या डेटावरून समोर आलं आहे. दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा (44.5 दशलक्ष/mL) फोन वापरणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा (56.5 दशलक्ष/mL) फोन न वापरणाऱ्या पुरुषांच्या गटाच्या सरासरी शुक्राणूंची गुणवत्ता लक्षणीयरीत्या जास्त होती.

मोबाइल फोनचा वापर आणि शुक्राणूंचा संबंध

दरम्यान, जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मोबाइल फोनचा वापर आणि शुक्राणूंची गती कमी होणे आणि त्याची संरचनात्मक वैशिष्ट्ये यांच्यात कोणताही संबंध नाही. गेल्या पन्नास वर्षांमध्ये वीर्य गुणवत्तेत झालेली घट स्पष्ट करण्यासाठी विविध पर्यावरणीय आणि जीवनशैली घटक प्रस्तावित केले गेले आहेत, पण मोबाइल फोनची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गर्भधारणेच्या टक्केवारीवरही परिणाम

शुक्राणूंची गुणवत्ता, एकूण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गती यासारख्या मापदंडांचे मूल्यांकन करून वीर्य गुणवत्ता निश्चित केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आकडेवारी नुसार, जर एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूंची एकाग्रता 15 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असेल, तर त्याला गर्भधारणेसाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. तसेच, जर शुक्राणूंची एकाग्रता 40 दशलक्ष प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असेल तर, गर्भधारणेची टक्केवारी कमी होते.

शूक्राणूंची गुणवत्तेवरही परिणाम

गेल्या 50 वर्षांत वीर्य दर्जा घसरल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. शुक्राणूंची संख्या सरासरी 99 दशलक्ष शुक्राणू प्रति मिलीलीटर वरून 47 दशलक्ष प्रति मिलीलीटर इतकी कमी झाल्याचं अहवालात समोर आलं आहे. हा पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीच्या सवयी म्हणजेच आहार, अल्कोहोल, तणाव, धूम्रपान यांचा परिणाम असल्याचं मानलं जातं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Health Tips : सौंदर्यही वाढेल, वजन कमी करण्यासह गरोदर स्रियांसाठीही गुणकारी; जायफळाचे हे फायदे माहित आहेत?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

About the author आयएएनएस

आयएएनएस वृत्तसंस्था (Indo-Asian News Service)
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget