Pregnancy Tips : गर्भवती महिलांना ऑफिसला जाताना कोणती काळजी घ्यावी, सविस्तर वाचा
Working During Pregnancy : वर्किंग महिलांसाठी गरोदकपणाचा काळ पार महत्त्वाचा असतो. या काळात त्यांना कामासह त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
Healthy Pregnancy Tips : नोकरदार महिलांसाठी (Working Women) गरोदरपणाचा (Pregnancy) काळ थोडा कठीण असतो. वर्किंग वूमन्सला गरोदरपणाच्या काळात कामासोबत आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. एक छोटासी चूक किंवा निष्काळजीपणा देखील तुमच्या आणि तुमच्या गर्भाच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते, त्यामुळे या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरदार महिलांनी गरोदरपणात आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं, कारण याबाबत तडजोड करणं महागात पडू शकतं.
दिवसाची सुरुवात लवकर करा
गरोदरपणात तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. याचं कारण म्हणजे पूर्वीसारखी घाईगडबडीत कामं करणं गरोदर महिलांसाठी सोपं नाही. झोपेतून उठल्यानंतर थोडावेळ चाला. बाहेर जाणं शक्य नसेल तर घरीच फिरा. जर डॉक्टरांनी व्यायाम करण्याच्या सूचना दिल्या असतील तर, त्यानुसार व्यायाम करा, याचा शरीराला फायदा होईल.
निरोगी आणि संतुलित आहार
गरोदरपणातही शरीराला सकस आणि संतुलित आहाराची गरज असते, त्यामुळे नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी टिफिन पॅक करताना हे लक्षात ठेवा. तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये, सुका मेवा यासारख्या गोष्टींचे प्रमाण वाढवा.
जास्त वेळ उपाशी राहू नका
गरोदरपणात महिलांनी ऑफिसमध्ये असताना कामाच्या गडबडीत खाण्याकडे दुर्लक्ष करु नका. जास्त वेळ उपाशी राहू नका. याचा तुमच्या आणि बाळाच्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल.
द्रव आहार महत्वाचा
आहारात इतर अन्नपदार्थांसह द्रवपदार्थांचा समावेश असावा. लिक्विड आहारामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. दररोद मुबलक प्रमाणात पाणी प्या. दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबत आहारात दूध, रस, सूप, ताक, लस्सी याचा समावेश करा, पण यासोबत महत्वाचे आहे. चहा-कॉफी जास्त पिऊ नका, शक्य असल्यास ग्रीन टी प्या.
आराम करा, ब्रेक घ्या
ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, पण त्यात स्वत:कडे दुर्लक्ष करु नका. एका जागी जास्त वेळ बसू नका. वेळोवेळी ब्रेक घेत राहा. यामुळे पाठ, कंबर, हात तसेच डोळ्यांना आणि मनालाही आराम मिळतो.
मानसिक दडपण घेऊ नका
गरोदरपणात ऑफिसचं काम किंवा कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण घेऊ नका. गरोदरपणाच्या काळात आईने आनंदी राहणं गरजेचं आहे. जास्त विचार करु नका. ताणतणावापासून दूर राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pregnancy : IVF उपचारादरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढण्यासाठी योग्य आहारही फायदेशीर, अभ्यासात उघड
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )