Patanjali News : 'सोरायसिस' आजारावर पतंजलीचे संशोधन, जगप्रसिद्ध जर्नलने घेतली दखल
Patanjali News: सोरोग्रिट आणि दिव्य तेलाच्या मदतीने सोरायसिस सारख्या आजारांना दूर करण्यात पतंजली यशस्वी ठरली आहे. या संशोधनातून आयुर्वेदाची ताकद दिसून येते, असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले.

Patanjali News : पतंजली आयुर्देवने गंभीर त्वचा रोग असलेल्या 'सोरायसिस'च्या उपचारात मोठं पाऊल टाकलं आहे. या आजारावरील संशोधन टेलर अँड फ्रान्सिस प्रकाशनाच्या जगप्रसिद्ध 'जर्नल ऑफ इन्फ्लॅमेशन रिसर्च'मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की पतंजलीच्या शास्त्रज्ञांनी सोरोग्रिट टॅब्लेट आणि एक तेल विकसित केले आहे, जे सोरायसिसच्या उपचारात प्रभावी सिद्ध झाले आहेत. हे संशोधन आयुर्वेदाची ताकद दाखवते अशी प्रतिक्रिया पतंजलीचे सहसंस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली.
सोरायसिस रोग नेमका काय आहे?
सोरायसिस हा एक क्रॉनिक ऑटोइम्यून रोग आहे ज्यामुळे त्वचेवर लाल पुरळ, चांदीसारखे खवले उठतात आणि तीव्र खाज सुटते. हा आजार रुग्णांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदनादायक आहे. साधारणपणे ॲलोपॅथीमध्ये त्याची लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु औषधांचे दुष्परिणामही दिसून येतात. तसेच, आजपर्यंत त्यावर कायमस्वरूपी इलाज नव्हता.
संशोधनावर पतंजली काय म्हणाले?
पतंजलीने म्हटले आहे की, "आम्ही नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर करून हे आव्हान स्वीकारले. शास्त्रज्ञांनी उंदरांवर दोन वेगवेगळ्या प्रीक्लिनिकल मॉडेल्समध्ये सोरायसिस परिस्थिती निर्माण केली आणि सोरोग्रिट टॅबलेट तसेच दिव्य तेल लावले. या प्रयोगामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले, जे या औषधाची प्रभाविता सिद्ध करतात. या संशोधनातून असे दिसून आले आहे की आयुर्वेदिक उपचारांमुळे केवळ गंभीर आजारांवर कायमस्वरूपी उपाय मिळत नाही तर ते सुरक्षित देखील आहेत."
परवडणाऱ्या दरात लोकांना उपचार देणे हे ध्येय
त्याचवेळी आचार्य बाळकृष्ण म्हणाले, "पतंजलीचे उद्दिष्ट लोकांना नैसर्गिक आणि स्वस्त दरात उपचार उपलब्ध करून देणे आहे. हे संशोधन केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर सोरायसिसने ग्रस्त लोकांसाठी आशेचा किरण आहे. पतंजलीचा हा प्रयत्न आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाशी जोडून आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























