चिंता वाढली! झपाट्याने पसरतोय Mpox, भारतही सतर्कतेच्या मार्गावर, तुमचं दार ठोठावण्यापूर्वी 'या' 6 पद्धतीने स्वत:चं संरक्षण करा
Mpox : या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने देखील जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये या संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर भारतही सतर्कतेच्या मार्गावर आहे.
Mpox : गेल्या काही वर्षात कोरोनाने (Cororna) अवघ्या जगभरात उच्छाद मांडला होता. यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता आणखी एका व्हायरसने जगाची चिंता वाढवलीय. Mpox म्हणजेच मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. याचे रुग्ण सातत्याने समोर येत आहेत. यामुळे अवघ्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एवढेच नाही तर मंकीपॉक्स विषाणूच्या वाढती रुग्णसंख्या पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही 6 पद्धतींचा अवलंब करू शकता.
जगातील विविध भागांत हळूहळू थैमान घालतोय
आफ्रिकन देशांतून सुरू झालेला हा संसर्ग आता जगाच्या अनेक भागांत हळूहळू थैमान घालत आहे. जगभरातील वाढती रुग्णसंख्या पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये या संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर भारतही सतर्कतेच्या मार्गावर आहे. या आजारावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसली तरी याची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत, जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत जागरूकता हाच त्यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे. आज आम्ही तुम्हाला Mpox विषाणूपासून बचाव करण्याच्या काही महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्सबद्दल सांगणार आहोत-
mpox व्हायरस म्हणजे काय?
Mpox विषाणू, पूर्वी मंकीपॉक्स व्हायरस म्हणून ओळखला जाणारा, हा एक संसर्गजन्य आजार आहे. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, लिम्फ नोड्स सुजणे, ताप आणि पूरळ येणे. बऱ्याच प्रमाणात, हे कांजिण्या सारखेच आहे.
mpox ची लक्षणे
ताप
थकवा
डोकेदुखी
थंडी जाणवणे
स्नायू दुखणे
सुजलेल्या लिम्फ नोड्स
पू भरलेली पुरळ
एमपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण करा.
हात व्यवस्थित धुवा - जेव्हाही तुम्ही कोणत्याही घाणेरड्या वस्तूला किंवा कोणत्याही दूषित वस्तूला स्पर्श करता किंवा कामावरून तसेच बाहेरून घरी परतता, तेव्हा तुमचे हात साबणाने आणि पाण्याने व्यवस्थित धुवा.
निरोगी आहार घ्या- MPox टाळण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आहारात अधिकाधिक खनिजे आणि जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
फेस मास्क घाला- कोणत्याही प्रकारचे विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू नये यासाठी फेस मास्क वापरा. मास्क घातल्याने हवेत जंतूंचा प्रसार रोखता येतो.
आजारी प्राण्यांशी संपर्क टाळा - जवळपास असलेल्या कोणत्याही आजारी किंवा जखमी प्राण्यांना स्पर्श करणे टाळा, किंवा त्यांच्या जवळ जाऊ नका. अशा स्थितीत जनावरांमध्ये विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.
प्रवास टाळा- शक्यतो कुठेही प्रवास टाळा. अगदी आवश्यक असल्याशिवाय घरीच रहा.
प्रवाशांशी संपर्क टाळा - परदेशातून घरी परतलेल्या लोकांशी संपर्क टाळणे चांगले. त्यांना mpox विषाणूची लागण होऊ शकते.
हेही वाचा>>>
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )