एक्स्प्लोर

Monkeypox : सावधान...भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर? 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? वेळीच जाणून घ्या..

Monkeypox : अलीकडेच भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आला आहे. ज्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

Monkeypox : मागील काही वर्षात कोरोनाने (Corona) थैमान घातले होते, त्यानंतर आता मंकीपॉक्स विषाणूने अवघ्या जगभरात थैमान घातल्याचं चित्र समोर येतंय. धक्कादायक बाब अशी की, भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. परदेशातून परतलेल्या तरुणामध्ये हा विषाणू असल्याचा संशय आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ब्लड रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, मंकीपॉक्स कसा पसरतो? शरीरावर कोणती लक्षणे दिसतात आणि प्रतिबंध कसा करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगतो.

 

जगभर वेगाने पसरतोय मंकीपॉक्स

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जगभर वेगाने पसरत आहे. आफ्रिकेतून उगम झाल्यानंतर हा विषाणू युरोप आणि अमेरिकेत पोहोचला आहे. आता भारतही या जागतिक आरोग्य संकटापासून अस्पर्श राहिलेला नाही. अलीकडेच देशात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण (Monkeypox First Case Of India) समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, एका व्यक्तीमध्ये या विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसून आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती नुकतीच परदेशातून परतली होती, त्यामुळे प्रकरण उघडकीस येताच, रुग्णाला तात्काळ वेगळे करून आवश्यक चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.

 

रुग्णाची प्रकृती कशी आहे?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) येथे रुग्णाचे नमुने तपासले जात आहेत. चाचणीचे निकाल आल्यानंतरच मंकीपॉक्सची पुष्टी होईल. मंत्रालयाने सांगितले की, या प्रकरणाबाबत सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे सक्षम आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणे आणि त्याच्याशी संबंधित प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सांगत आहोत.


मंकीपॉक्स कसा पसरतो?

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी थेट संपर्क साधून पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या जखमा, द्रव किंवा संक्रमित सामग्रीच्या संपर्कातून देखील पसरू शकतो. नुकत्याच झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत, हे उघड झाले की, मंकीपॉक्सचा संसर्ग सामान्यतः 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्णांना फक्त सामान्य काळजी आणि पुनर्प्राप्तीची आवश्यकता असते. हा रोग प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून, विशेषत: लैंगिक संबंधादरम्यान किंवा संक्रमित व्यक्तीच्या जखमांशी थेट संपर्काद्वारे पसरतो.

 

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे संसर्गानंतर साधारणपणे 5 ते 21 दिवसांत दिसतात.

  • ताप
  • डोकेदुखी
  • स्नायू दुखणे
  • पाठदुखी
  • थंडी जाणवणे
  • थकवा
  • वेदनादायक पुरळ उठणे
  • सुजलेल्या लिम्फ नोड्स

काही प्रकरणांमध्ये, रुग्णांमध्ये खालील लक्षणे देखील असू शकतात.

  • श्वास घेण्यात अडचण
  • गिळण्यात अडचण
  • डोळ्यांत सूज येणे

डॉक्टरांना कधी भेटायचे?

  • मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
  • मंकीपॉक्स टाळण्यासाठी उपाय
  • संक्रमित जनावरांपासून दूर राहा.
  • संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
  • सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला.

 

हेही वाचा>>>

Monkeypox : OMG...मंकीपॉक्सचा मेंदूवरही होतोय परिणाम? परदेशात वाढतेय रुग्णसंख्या, तज्ज्ञांनी काय इशारा दिला?

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Embed widget