Mens Health : पुरूषांनो..तुमचंही आरोग्य तितकंच महत्त्वाचं, वरदानापेक्षा कमी नाही 'हे' आसन! फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल..
Mens Health : तुम्हाला माहिती आहे का? पुरूषांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येत एका आसनाचा समावेश केल्यास अगणित फायदे होऊ शकतात..
Mens Health : महिलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पुरूषांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे, अनेकदा आपण पाहतो, पुरूषांना शारिरीक किंवा मानसिक समस्या असल्यास ते फारशी तक्रार करत नाही, कारण ऑफिस आणि घराच्या टेन्शनमुळे पुरुष अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, ज्याचे परिणाम मोठे झाल्यावर दिसू लागतात. तुम्हाला माहिती आहे का? की योगासनापैकी धनुरासनाचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्याने पुरुषांच्या आरोग्यासाठी अगणित फायदे होऊ शकतात? जाणून घ्या...
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर
धनुरासनाच्या मदतीने पुरुष केवळ त्यांचे शरीर लवचिक बनवू शकत नाहीत, तर हार्मोनल चढ-उतारांमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या टाळू शकतात. योगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे आसन पुरूषांत्या हृदयाशी संबंधित आजारांपासून तुमचे संरक्षण कसे करू शकते? तसेच पाठीचा कणा सरळ ठेवण्यासही मदत करू शकते. हे योगासन शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरते. जाणून घेऊया..
'धनुरासन' पुरुषांसाठी का फायदेशीर आहे?
धनुरासन हे योगातील सर्वात महत्त्वाचे आसन आहे, ते शरीर लवचिक बनवण्यास, मणक्याचे बळकटीकरण आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. जरी हे स्त्रियांसाठी अधिक लोकप्रिय मानले जात असले तरी, प्रत्यक्षात त्याचे फायदे पुरुषांसाठी देखील महत्त्वाचे आहेत. चला जाणून घेऊया पुरुषांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत या योगासनाचा समावेश का करावा?
शारीरिक आरोग्यासाठी फायदे
मणक्याला बळकटी देते : धनुरासनामुळे पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो, ज्यामुळे पाठदुखी, डोकेदुखी आणि मणक्याशी संबंधित इतर समस्या टाळण्यास मदत होते.
पचन सुधारते : धनुरासनामुळे अवयवांचे दाब वाढून पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होते.
श्वासोच्छवास सुधारतो : हे आसन फुफ्फुस उघडून श्वासोच्छवासाची क्षमता वाढवते, ज्यामुळे ऑक्सिजन शोषण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते : धनुरासन हृदयाचे ठोके वाढवून रक्त प्रवाह सुधारते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लवचिकता वाढवते : हे आसन शरीराच्या वेगवेगळ्या स्नायूंना ताणून लवचिकता वाढवते, ज्यामुळे तुम्हाला दुखापतीनंतर अंतर्गत नुकसान होण्यापासून वाचवता येते.
मानसिक आरोग्यासाठी फायदे
तणाव कमी होतो: धनुरासन तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे चांगली झोप आणि मनःशांती वाढते.
मूड सुधारतो : हे आसन शरीरात एंडोर्फिनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते.
आत्मविश्वास वाढवतो: धनुरासनाच्या मदतीने शरीराची स्थिती सुधारून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
असे 'धनुरासन' करावे
सर्वप्रथम पोटावर झोपा आणि गुडघे वाकवून पायांचे तळवे खाली ठेवा.
यानंतर हात मागे घ्या आणि टाचेला धरा.
हळूहळू तुमचे शरीर वर करा, छाती वर करा आणि पाठीचा कणा पाठीमागे करा.
ही स्थिती काही सेकंद धरून ठेवा, नंतर हळू हळू खाली करा.
या गोष्टीही लक्षात ठेवा
धनुरासन करताना शरीर सैल सोडा.
तुम्हाला कोणतीही दुखापत किंवा आरोग्य समस्या असल्यास, हे करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा>>>
Men's Health : 'अनेक पुरूष त्यांच्या भावना मनातच दडपून टाकतात' पुरुषांचं 'मानसिक आरोग्य' महिलांपेक्षा अधिक तणावपूर्ण? 'या' मार्गांनी मदत करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )