International Yoga Day: संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ
International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार आणि पतंजलीच्या पाठिंब्यानं जागतिक आरोग्य आणि एकतेचं प्रतीक बनलं आहे. पतंजलीनं योगाला लोकप्रिय केलं आहे.

International Yoga Day 2025:आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. योग आता जागतिक चळवळ बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि पतंजली योगपीठ यांच्या प्रयत्नाला याचं श्रेय जातं. 2014 मध्ये सुरु झालेला उपक्रम जगभरात लाखो लोकांच्या शारीरिक , मानसिक आणि अध्यात्मिक कल्याणासाठी योगाच्या माध्यमातून जोडलं गेलं आहे. योगगुरु बाबा रामदेव यांच्या नेतृत्त्वात पतंजलीनं या चळवळीला व्यापक केलं आहे. ज्यामुळं योग घरोघरी पोहोचला आहे.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यामध्ये योगामुळं होणाऱ्या फायद्यांवर जोर देण्यात आला होता. 177 देशांच्या पाठिंब्यानं संयुक्त राष्ट्रांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर केला होता. ही तिथी अनेक संस्कृती आणि अध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची आहे. 2015 मध्ये पहिल्यांदा योग दिन न्यूयॉर्क, पॅरिस आणि बीजिंग शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला, त्यामुळं योग चळवळीचा पाया रचला गेला.
पतंजलीची महत्त्वाची भूमिका
पतंजलीनं योगपीठानं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरात एक लाखांहून अधिक योग शिबिरांचं आयोजन पतंजलीनं करुन योग वेगवेगळ्या समुदायांपर्यंत पोहोचवलं आहे. 2015 मध्ये दिल्लीच्या राजपथावर झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात 35985 लोकांनी एकाच वेळी योग केला. जे सर्वात मोठं योग सत्र आणि 84 देशांच्या सहभागामुळं दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात यशस्वी ठरलं. यामुळं योगाला सार्वभौम मान्यता मिळाली, तर पतंजलीची कटिबद्धता दिसून आली.
विदेशात हजारो लोकांकडून योगाचा स्वीकार
पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांमुळं आणि योगाच्या वैज्ञानिक दृष्टिकोणामुळं योगाची विश्वसनीयता वाढली आहे. जपान, अमेरिकेत पतंजलीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमामुळं योग दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. तणाव, मधूमेह आणि महिलांच्या आरोग्याच्या मुद्द्यांमध्ये योगाचा फायदा होत आहे. जपानमध्ये पतजंजलीनं जपान फाऊंडेशनसह भारतीय दूतावासाच्या सहकार्यानं 10 हजार लोकांपर्यंत योग पोहोचवला. ज्यामध्ये स्थानिकप्रथान जेन ध्यानसोबत जोडून घेण्यात आलं.
शांतता आणि एकतेचं प्रतीक
2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग अशी थीम ठेवण्यात आली आहे. योग व्यक्तिगत कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावते. आंतरराष्ट्रीय योग दिवस 11 व्या वर्षात प्रवेश करत आहे. पतंजलीचं योग संदर्भातील योगदान लाखो लोकांना प्रेरित करतं. ज्यामुळं आरोग्य, शांतता आणि एकतेचं प्रतीक योग बनला आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























