एक्स्प्लोर

Immunity Tips : इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय, BF.7 आणि व्हायरल आजारांपासूनही मिळेल सुटका

Immunity Boosting Tips : एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे व्हायरल फ्लूचा धोका, अशात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल? वाचा.

How To Improve Immunity : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. यासोबतच तुम्ही काही घरगती उपायांनी तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. 

तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल? (How to Improve Your Immunity)

इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय येथे जाणून घ्या. हा उपाय फारच प्रभावी ठरेल. शिवाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. हा सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे सैंधव मीठ (Himalayan Salt). यालाच रॉक सॉल्ट (Rock Salt) असेही म्हणतात. पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल. 

यासाठी काय करावे?

एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ (Himalayan Salt) म्हणजे रॉक सॉल्ट (Rock Salt) मिसळा. आता हे पाणी सरबताप्रमाणे हळूहळू प्या.

सैंधव मिठयुक्त पाणी सेवन करण्याचे फायदे?

  • सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीराती तीनही दोष, वात-पित्त-कफ यांचे संतुलन राखले जाते. आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ हे शरीराचं संतुलन राखतात. या तीन दोषांमधील असमतोल प्रत्येक रोगाचे मूळ असल्याचे मानले जाते.
  • सैंधन मिठाचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते आणि चयापचय वाढते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंचा शरीरावर हल्ला रोखण्यास मदत होते.
  • तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्हाला दररोज एक ग्लास हे पाणी प्यावे लागेल. तुमच्या शरीराला आवश्यक खनिजे मिळतील. खनिजांच्या संतुलित प्रमाणामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल.
  • सैंधव मिठाचं पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपण तुलने कमी पाणी पितो, यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. अशावेळी सैंधव मिठयुक्त पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. याशिवाय, सैंधव मिठाच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात.

स्नायू दुखी आणि पेटके या समस्यांपासून सुटका

शरीरात काही आवश्यक खनिजांच्या कमतरतेमुळेही स्नायू दुखी आणि पेटके या समस्या उद्भवतात. एका ग्लास पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला या त्रासापासून आराम मिळेल.

रक्तदाब सामान्य ठेवण्यास उपयुक्त

मिठाचे अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. पण सैंधव मीठ रक्तदाब सामान्य ठेवण्यास प्रभावी आहे. सैंधव मीठ पोटॅशियमने समृद्ध असते, त्यामुळे या मिठामुळे रक्तदाब वाढत नाही तर रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांना सैंधव मिठाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेच आहे, त्यानंतरच सैंधव मिठाचं सेवन करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Eye Redness: पावसाळ्यात डोळे लाल होतायत? चुकुनही दुर्लक्ष करू नका; हे असू शकतं गंभीर आजाराचंही लक्षण !
पावसाळ्यात डोळे लाल होतायत? चुकुनही दुर्लक्ष करू नका; हे असू शकतं गंभीर आजाराचंही लक्षण !
Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?
रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?
Health Tips : मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे वाढतोय रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका; तज्ज्ञांता 'हा' सल्ला महत्त्वाचा
मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे वाढतोय रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका; तज्ज्ञांता 'हा' सल्ला महत्त्वाचा
Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न
आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget