Belly Fat : पोट सुटलंय? आजचं 'या' सवयी सोडा, पोटावरील चरबी वाढण्याची कारणं जाणून घ्या
Weight Loss Tips : सुटलेलं पोटं किंवा बेली फॅट यामुळे अनेकांचा आत्मविश्नास कमी होतो, अनेक जण या समस्येने त्रस्त आहे. पोट सुटण्याची नेमकी कारणं काय ते जाणून घ्या.
How to Lose Belly Fat : सध्या अनेक जण वाढलेलं वजन (Obesity) आणि सुटलेलं पोट (Belly Fat) यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. तरुण असो किंवा तरुणी बेली फॅटची समस्या बहुतेक सर्वांनाच भेडसावत आहे. पोटाची चरबी वाढल्यामुळे तरुणींचं फिगर बिघडतं आणि मग त्यांना हवे तसे कपडे घालता येत नाहीत. तर तरुणांनाही फिट दिसायला आवडतं, पण पोट सुटलेलं असेल, तर अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. बेली फॅट म्हणजेच सुटलेलं पोट कमी करणं फार अवघड आहे. दररोज न चुकता अनेक तास घाम गाळल्यानंतर काही इंच पोट कमी होतं. पण, पोटावरील चरबी वाढण्याचं म्हणजेच पोट सुटण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या.
पोटाची चरबी का वाढते? याची कारणे काय?
पोटाची चरबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले अन्न. जेव्हा आपण काही खातो तेव्हा त्यातून मिळणार्या कॅलरीज बर्न होत नाहीत, तर वजन आणि पोटाची चरबी वाढू शकते. वाढत्या वयाबरोबर स्नायू क्षीण झाल्यामुळे फारसे सक्रिय न राहणे देखील पोटाची चरबी वाढवू शकते.
पोटाची चरबी वाढण्याची 5 कारणे
1. चुकीचा आहार
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील पोटावरील चरबी वाढण्याचं एक कारण आहे. जास्त साखरयुक्त आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते. या गोष्टींमध्ये आढळणारे कार्ब्स पोटाची चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
2. अपुरी झोप
अनियमित आणि अपुरी झोप हे देखील पोटाची चरबी (Belly Fat) वाढण्याचं एक कारण आहे. अपुरी झोप बेली फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे, दररोज किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.
3. तणाव
ताणतणावाच्या तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉर्टिसॉल हार्मोन तणाव नियंत्रित करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीर कॉर्टिसॉल हार्मोन सोडते, ज्यामुळे चयापचय प्रभावित होऊ शकतो आणि चरबी वाढू शकते.
4. दारू
अल्कोहोल प्यायल्याने देखील पोटावरील चरबी वाढू शकते. जास्त प्रमाणात दारू पिणे यकृताच्या आरोग्यासाठी वाईट आहे. तसेच सूज वाढवण्याचे काम करते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मद्यपान हे पुरुषांमध्ये बेली फॅट वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं.
5. धूम्रपान
धूम्रपान हे पोटाची चरबी वाढण्याचे थेट कारणीभूत नसलं तरी ते पोटावरील चरबीचे एक कारण मानलं जातं. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करायची असेल तर धूम्रपान टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Best Diet Plan : वजन कमी करायचं मग 'हे' डाएट करून पाहा, व्हॉल्यूम डाएट काय आहे? माहितीय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )