Winter Health Tips : हिवाळ्यात डिप्रेशन आणि आत्महत्येचं प्रमाण वाढतं, 'हे' आहे कारण
Winter Health Tips : तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यामध्ये डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ होते. तर आत्महत्येचं प्रमाणही वाढतं. यामागचं कारण काय आहे जाणून घ्या.
Depression Cases Increase In Winter : दिवाळीनंतर गुलाबी थंडीला (Winter) सुरुवात होते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यामध्ये (Winter) डिप्रेशन (Depression) संबंधित रुग्णांमध्ये वाढ होते, त्याशिवाय हिवाळ्यामध्ये आत्महत्याही अधिक प्रमाणात होतात. हे तुम्हाला माहित आहे का? थंडीमध्ये आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढतं, यामुळे थंडीमध्ये डिप्रेशनच्या रुग्णांचे प्रमाण वाढते, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. यामागचं नेमकं कारण काय आहे, येथे वाचा.
हिवाळ्यात डिप्रेशनचे रुग्ण का वाढतात?
मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांना हिवाळ्याच्या काळात नैराश्याच्या रुग्णांची संख्या वाढण्यामागचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितलं की, 'हिवाळ्यात नैराश्य म्हणजे डिप्रेशन वाढण्याचं कारण थेट हवामानाशी संबंधित आहे. उदासीनता वाढण्याचे पहिलं कारण म्हणजे हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची वेळ कमी होते, त्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनच्या स्रावावर परिणाम होतो. हा मूड आनंदी करणारा हार्मोन आहे, याला हॅपी हॉर्मोन असेही म्हणतात. हा हॉर्मोन मेंदूसाठी न्यूरोट्रांसमीटर म्हणून देखील कार्य करतो आणि थेट मूडवर परिणाम करतो. या हार्मोनची पातळी कमी झाल्याने मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि डिप्रेशन वाढतं. याला हंगामी प्रभावात्मक विकार देखील म्हणतात.
तर यामागचं दुसरं कारण म्हणजे थंडी हे आपल्या शरीरासाठी तणावाप्रमाणे असते. थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीर स्वतःला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतं. यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्सची गरज भासते आणि जेव्हा शरीर मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स वापरतं तेव्हा कॉर्टिसोलचे उत्सर्जन वाढतं. कार्टिसोल हा एक निगेटिव हार्मोन आहे, या नैराश्य वाढते. यामुळे जेव्हा हिवाळ्यात शरीराच्या आत कोर्टिसोलचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक दुःखी असतात, नैराश्याच्या आहारी जाऊ लागतात.
डिप्रेशनची लक्षणे
- उदास वाटणे, काहीही न समजणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे.
- तुमचं आवडतं काम करण्याचीही इच्छा नसणे.
- कायम थकवा जाणवणे, कंटाळा येणे.
- खूप झोप येणे, नेहमी झोपण्याची इच्छा असणे.
- वारंवार क्रेविंग होणे आणि त्यामुळे वजन वाढणे.
- कोणत्याही कामात लक्ष नसणे.
- आत्मविश्वासाचा अभाव आणि प्रत्येक चुकीसाठी दोषी वाटणे.
- जगण्याची इच्छाशक्ती कमी होऊन मनात आत्महत्येचे विचार येतात.
डिप्रेशन टाळण्यासाठी काय करावं?
- सूर्यप्रकाशात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा.
- नकारात्मक विचार टाळण्यासाठी ध्यान करा.
- योगा क्लास किंवा डान्स क्लासमध्ये जा.
- आपल्या छंदांकडे लक्ष द्या.
- आठवड्यातून किमान एकदा कोणत्याही मोकळ्या ठिकाणी फिरायला जा.
- नकारात्मक विचार आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहा.
- गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांना भेट देण्याची खात्री करा. कारण या परिस्थितीत हार्मोनल स्राव संतुलित करण्यासाठी अनेकदा औषधे किंवा उपचारांची गरज असते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )